Monday , September 21 2026
Breaking News

तीन वर्षांत नातेवाईकासह मित्रांना २१०० रोपांची भेट

Spread the love

 

निसर्गप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले दांपत्यांचा उपक्रम ; वृक्षप्रेम वाढविण्याचा घेतला ध्यास

निपाणी (वार्ता) : वाढदिवस, विवाह, वास्तूशांती, स्मृतिदिन, रक्षा विसर्जन अशा विविध प्रकारचच्या निमित्ताने इतर कोणती भेटवस्तू देण्यापेक्षा देशी वृक्षाचे रोपटी भेट देऊन वृक्षप्रेम वाढविण्याचा वसा येथील गायत्री नगरातील पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले आणि पत्नी शिक्षिका अपूर्वा चौगुले यांनी जपला आहे. तीन वर्षांत त्यांनी २१०० रोपे मित्र परिवार व नातेवाइकांना भेट दिली आहेत. त्यांनीवृक्षप्रेम वाढविण्याचा घेतलेला वसा पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
येथील रहिवासी अर्जुनी (ता. कागल) येथील लालबहादूर शास्त्री विद्यामंदिर मधील निसर्गप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले आणि पत्नी शिक्षिका अपूर्वा चौगुले हे गेल्या पाच वर्षापासून देशी वृक्ष लागवड वाढविण्यासाठी विविध गावांमध्ये वृक्षारोपण करीत आहेत. वड, पिंपळ, उंबर, कडुनिंब, करंज, आंबा, चिकू, चिंच, आवळा वनौषधी रोपे असे देशी वृक्ष नातेवाईक व मित्रांच्या वास्तुशांती, वाढदिवस, विवाह किंवा अन्य कोणत्याही कार्यक्रमात ते रोपटी भेट देत आहेत.
लग्नकार्यात संबंधितांना देशी वृक्षाबद्दल प्रेम निर्माण होण्यासाठी भेटवस्तू म्हणून देशी रोपटी व फळांची झाडे भेट देऊन ती जपण्यासही सांगत आहेत. त्यांनी आजवर अनेक मित्रांसह शाळा, मंदिर, स्मशानभूमी, युवक मंडळ, गणेश मंडळांना जांभूळ, केशर, आंबा, चिक्कू, सीताफळ, पेरू आदी फळांची रोपे दिली आहेत.
——————————————————————-

निसर्गाशी नाते प्रत्येकाने जोपासली पाहिजे. त्यामुळे माणसांना मुबलक ऑक्सिजन मिळते. यासाठी शुद्ध हवेसाठी देशी वृक्षांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. यासाठी वृक्षाचे संगोपन करण्याची सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी मी माझा खारीचा वाटा या वृक्ष भेटी उपक्रमाद्वारे उचलण्याचा प्रयत्न करत आहे.’

-नामदेव चौगुले, पर्यावरण प्रेमी शिक्षक, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *