Sunday , July 26 2026
Breaking News

देवराजअर्स निगम योजनेमधून बोरगावमध्ये कुपनलिका खोदाईचा प्रारंभ

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : आमदार शशिकला जोल्ले आणि बीडीसीसी बँकेचे अध्यक्ष व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून देवराज अर्स योजनेतून बोरगाव येथे ओबीसी ए मधील शेतकरी विजय गावडे आणि शेषु ऐदमाळे यांना कुपनलिका मंजूर केली होती. या कामाचा प्रारंभ श्री १०८ शांतीसागर को-ऑप सोसायटीचे संचालक जितू भोजे -पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. दोन्ही शेतकऱ्यांना प्रत्येकी ३ लाख २५ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
शिद्राई देवस्थान व बिरोबा देवस्थानचे पुजारी ओंकार पुजारी यांच्या हस्ते बोरवेल मशीनचे पूजन करण्यात आले. त्यानंतर माजी नगरसेवक अजित तेरदाळे, जितू पाटील, संचालक महादेव ऐदमाळे, भरत कांबळे यांच्या हस्ते कुपनलिका खोदाईचा प्रारंभ करण्यात आला. जितू भोजे -पाटील यांनी, आमदार शशिकला जोल्ले यांनी बोरगाव परिसराच्या विकासासाठी लाखो
रुपयांचा निधी मंजूर करून सर्वांगीण विकास केला आहे. बोरगाव येथे पानंद रस्ते, गंगा कल्याण योजनेअंतर्गत शेकडो बोरवेल मंजूर करून शेती परिसराचा नंदनवन करण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ राजकारण न करता बोरगावचा सर्वांगीण विकास केल्याचे सांगितले. बोरगाव बिरेश्वर शाखेचे अध्यक्ष अजित तेरदाळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी अजित तेरदाळे, महादेव ऐदमाळे, भरत कांबळे, अजित कांबळे, विजय गावडे, संदीप चिप्रे , बिरेश गावडे, विठ्ठल माळगे, म्हाळू गावडे, नागेश गावडे, म्हाळू माळगे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *