
बिजगर्णी : सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून कार्य केल्यानं आनंद होतो. इतरांना समजून घ्या. समस्या जाणून घेऊन सहकार्य करणं हीच माणुसकी आहे इतरांना देत रहा, तुम्ही मोठे व्हाल. दिल्यामुळे कृतज्ञतेची भावना व्यक्त होते. जिल्ह्यातील पंचाहत्तर शाळांना भेटी देऊन, पाणी उपलब्ध करून देणे, प्लॅस्टिक मुक्त अभियान राबविणे हा संदेश आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं तेही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देणे. त्यातून विद्यार्थ्यांना आनंद होतो तेच समाधान लाभते असे भावनिक विचार अमूल्य बुंद फाउंडेशनच्या सौ आरती भंडारी यांनी बिजगर्णी हायस्कूल येथे व्यक्त केले.
बिजगर्णी हायस्कूल येथे नूतन स्वच्छता गृह इमारतीचे उद्घाटन नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष एस.एम. जाधव होते.
स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मान्यवराच्या हस्ते दीप प्रज्वलन केले. उपस्थित व्यासपीठावरील मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
प्रमुख अतिथी रोटरीचे गव्हर्नर अशोक नाईक यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून नवीन बांधलेल्या स्वच्छता गृहाचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण भागातील बिजगर्णी हायस्कूलच्या सुविधा उपलब्ध करून मोलाचं योगदान दिले आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातून बेंच मंजूर करण्यात आले आहेत असे अशोक नाईक यांनी जाहीर केले.
अमूल्य बुंद फाउंडेशनच्या वतीने सौ. आरती भंडारी यांनी स्वखर्चाने दीड लाख खर्च करून स्वच्छता गृह बांधून दिले. इंजिनिअर भरमा चोपडे यांनी आकर्षक इमारत उभी केली.
यावेळी पश्चिम विभाग शिक्षण संस्थेमार्फत सौ. आरती भंडारी, अशोक नाईक, भरमा चोपडे यांचा शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी महात्मा गांधी सामाजिक संस्थचे अध्यक्ष वाय पी नाईक, सह्याद्री सोसायटी चेअरमन पी. पी. बेळगावकर, मराठा बॅंक संचालक अशोक कांबळे, यांनी देणगीदारांचे गौरवोद्गार मनोगत व्यक्त करुन समाजात देणारे हात पुढे असल्याने विधायक कार्य होत आहेत. कृतज्ञता व्यक्त केली
व्यासपीठावर संस्था उपाध्यक्ष एस.एम. जाधव, अशोक नाईक, आरती भंडारी, यल्लापा बेळगावकर, ग्रामपंचायत अध्यक्षा रेखा नाईक, पुंडलिक जाधव, संस्था सचिव ए एल निलजकर, पी पी बेळगावकर वाय पी नाईक, भरमा चोपडे, माजी मुख्याध्यापक वाय एच पाटील, माजी अध्यक्ष मनोहर बेळगावकर, अशोक कांबळे, संतोष कांबळे उपस्थित होते.
या कार्यक्रमाला गावातील मारुती जाधव, परशराम भास्कर, के.आर भाष्कळ, भाऊराव जाधव, प्रभाकर जाधव, मल्लापा भास्कर, मनोहर पाटील, शीतल तारीहाळकर, गुंडू भाष्कळ, नामदेव कांबळे, नारायण कांबळे, एम.एम. जाधव, शाळेतील शिक्षक, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वच्छता गृहाची सोय झाल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात आले.
प्रास्ताविक मुख्याध्यापक आर एम. कांबळे, सूत्रसंचालन सौ.आर पी सरवणकर, आभार ए.एम. दरेकर यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta