बेळगाव (वार्ता) : बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीची स्केटिंगपटू करुणा राजन वाघेला हिला 2021 सालचा जिल्हा बाल प्रतिभा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
मागील सात वर्षात तिने स्केटिंग क्षेत्रात केलेल्या उल्लखनीय कामगिरीबद्दल तिला हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
तिने स्केटिंग क्षेत्रात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी बजावीत अनेक पुरस्कार पटकाविले आहेत. तिच्या या कार्याची दखल घेवून तिला तिला भव्य अशा समारंभात राजेंद्र भंडारी यांच्या हस्ते जिल्हा बाल प्रतिभा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला महिला आणि बालकल्याण खात्याचे उपसंचालक बसवराज वरवट्टी, अधिकारी कल्पना तमन्नावर, यल्लाप्पा गडादी, डी. एस. कुडलकील्क, सुरेखा हिरेमठ, नंदेश्वर, राममूर्ति के. व्ही. उपस्थित होते. दहा हजार रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
करुणा ही बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीचे स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ती स्केटिंगचा सराव करते.
Belgaum Varta Belgaum Varta