Tuesday , March 3 2026
Breaking News

बेळगावमध्ये प्रथमच ब्लेडलेस रोबोटिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया

Spread the love

 

एम. एम. जोशी – कोडकणी आय सेंटरमध्ये Z8 झीमर तंत्रज्ञानाची यशस्वी अंमलबजावणी
बेळगाव : एम.एम. जोशी-कोडकणी सुपर स्पेशालिटी आय सेंटरमध्ये अत्याधुनिक Z8 झीमर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शहरातील पहिली ब्लेडलेस रोबोटिक कॅटरॅक्ट (मोतीबिंदू) शस्त्रक्रिया आणि क्लिअर लेसिक सर्जरी यशस्वीपणे पार पडली. या माध्यमातून जागतिक दर्जाचे नेत्रचिकित्सा तंत्रज्ञान बेळगावमध्ये उपलब्ध झाले आहे.

फेम्टो सेकंद लेसरवर आधारित ही रोबोटिक पद्धत अत्यंत अचूक, सुरक्षित आणि प्रभावी मानली जाते. ‘क्लिअर’ (कॉर्नियल लेंटिक्युल एक्सट्रॅक्शन फॉर अॅडव्हान्स्ड रिफ्रॅक्टिव्ह करेक्शन) या तंत्राद्वारे चष्म्याचा नंबर कमी किंवा पूर्णपणे काढून टाकणे शक्य होते. सर्व वयोगटातील रुग्णांना अधिक स्पष्ट दृष्टी आणि जलद पुनर्प्राप्तीचा लाभ या प्रक्रियेमुळे मिळतो.

डॉ. शिल्पा कोडकणी आणि त्यांच्या टीमने या शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडल्या. Z8 झीमर प्रणाली ही खऱ्या अर्थाने ब्लेडलेस, फेम्टो सेकंद लेसर-आधारित रोबोटिक तंत्रज्ञान असून मोतीबिंदू, क्लिअर लेसिक तसेच कॉर्नियल ट्रान्सप्लांटसारख्या शस्त्रक्रियांसाठी उपयुक्त आहे. एकाच मशीनद्वारे विविध नेत्रशस्त्रक्रिया करण्याची सुविधा या तंत्रज्ञानात आहे.

गेल्या सहा दशकांपासून नेत्ररोग सेवेत आघाडीवर असलेल्या एम.एम. जोशी–कोडकणी आय सेंटरने उत्तर कर्नाटकातील रुग्णांसाठी परवडणाऱ्या दरात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा ध्यास घेतला आहे. Z8 झीमर तंत्रज्ञान आता उत्तर कर्नाटकातील एम.एम. जोशी आय इन्स्टिट्यूटच्या सर्व केंद्रांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *