Monday , June 1 2026
Breaking News

साखरवाडीतील हनुमान मंदिर जीर्णोद्धारासाठी निधीच्या मागणीचे आमदार गणेश हुक्केरी यांना निवेदन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील जुन्या पी.बी. रोडवरील साखरवाडी येथील पुरातन श्री मारूती मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. भाविकांनी देणगीदारांच्या सहकार्याने अंतिम टप्प्यात आले आहे. चिक्कोडी-सदलगा मतदार संघाचे आमदार गणेश हुक्केरी, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद यांनी मंदिरास्थळी भेट देवून कामाची पाहणी केली.यावेळी आमदार हुक्केरी यांनी निपाणी व परिसरातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या या मंदिराच्या जीर्णोध्दाराच्या कामाकरीता निधी देण्याच्या मागणीचे निवेदन चंद्रकांत जासूद यांच्या हस्ते देण्यात आले. त्यांनी निवेदन स्वीकारून मंदिराच्या जीर्णोदरासाठी सर्वतोपरी सहकार्य करून जास्ती जास्त निधी मिळवून देण्याचे प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद म्हणाले, मंदिराच्या कामाकरीता परिसरातील नेते मंडळी, मान्यवर, देणगीदार आणि भाविकांकडून आर्थिक मदत मिळाली आहे. आततापर्यंत सुमारे १ कोटी ४० लाखापेक्षा अधिक रक्कम जीर्णोद्धारासाठी खर्च करण्यात आला आहे .मंदिराचे काम अंतिम टप्प्यात असून थोड्याच काळात ते पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण केले जाईल. उर्वरित कामासाठी अजूनही निधीची आवश्यकता असून ती उभी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी याकामी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी प्रथमेश जासूद, नवनाथ चव्हाण, अतुल चावरेकर, सुधाकर सोनाळकर, सौरभ लोहार यांच्यासह साखरवाडी समाजाचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव नाक्यावरील जलवाहिनीला दुरुस्तीनंतरही गळत

Spread the love  शहर विस्तारले पण पाणी प्रश्न सुटेना निपाणी (वार्ता) : निपाणी शहराचा विस्तार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *