Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगावात दुचाकी चोरट्यांचा पर्दाफाश; दोन आंतरजिल्हा आरोपी अटकेत : १३ दुचाकी जप्त

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरात सातत्याने घडणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटनांचा तपास करताना एपीएमसी पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. विशेष मोहिम राबवत पोलिसांनी दोन आंतरजिल्हा चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून एकूण ५ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या १३ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

कंग्राळी के.एच. येथील दीपक भागानगर यांची दुचाकी १० फेब्रुवारी रोजी चोरीला गेल्याची तक्रार एपीएमसी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक यू. एस. अवटी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले. पथकाने तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढला.

तपासा दरम्यान हुक्केरी तालुक्यातील बेलद बागेवाडी येथील उमेश बागेवाडी तसेच गुडस गावातील मौला हसनसाब हलकर्णी या दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

आरोपींकडून ११ हिरो स्प्लेंडर आणि २ हिरो एचएफ डिलक्स अशा एकूण १३ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या सर्व वाहनांची अंदाजे किंमत ५.३५ लाख रुपये आहे.

या कारवाईत पीएसआय एस. आर. मुत्तत्ती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्याची दखल घेत पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी पथकाचे कौतुक केले. या धडक मोहिमेमुळे शहरातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांना मोठा चाप बसला असून पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *