Thursday , March 5 2026
Breaking News

चलवेनहट्टी येथे महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : चलवेनहट्टी येथील ब्रम्हलिंग देवस्थान येथे महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून रविवार, फेब्रुवारी २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. पहाटे मंदिरातील देवाची विधिवत पूजा करण्यात येणार असून त्यानंतर भाविकांसाठी दर्शनाची व्यवस्था करण्यात येईल.

दिवसभर भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असून रात्री संगीत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडणार आहे.

तसेच सोमवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजल्यापासून महाप्रसादास सुरुवात होणार आहे. तरी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *