
बेंगळुरू : बेंगळूरू येथे रविवारी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, पुणे व कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कवी संमेलन, पुरस्कार प्रदान सोहळा, प्रकट मुलाखत तसेच पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचा भव्य उद्घाटन सोहळा डॉ. पुष्पा द्रविड यांच्या हस्ते संपन्न झाला.
या साहित्यिक सोहळ्यास ज्येष्ठ मराठी साहित्यिक डॉ. उमा कुलकर्णी, इस्रोच्या प्रख्यात शास्त्रज्ञ तनुजा देशपांडे, डॉ. संध्या राजन, डॉ. अनुराग लव्हेकर तसेच अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमात डॉ. वैजनाथ शेगदार स्मरणार्थ व सुमन शेगदार पुरस्कृत माझी मराठी काव्यरत्न पुरस्कार, मराठी साहित्य लेखिका डॉ.संध्या राजन यांना प्रदान करण्यात आलामराठी भाषा व साहित्याच्या संवर्धनासाठी आयोजित ह्या सोहळ्यासंदर्भात ज्येष्ठ साहित्यिक आणि कवयित्री डॉ. संध्या राजन अणवेकर यांनी आपल्या दिवंगत मातोश्री शोभना बेंडिगेरी यांच्या स्मरणार्थ करामसापला एक लाखाची देणगी सुपूर्द केली.
डॉ. अनुराग लव्हेकर लिखित पुस्तके साद आणि दादचे प्रकाशन डॉ. पुष्पा द्रविड यांच्या हस्ते करण्यात आले.
बेंगळूरू विभागाच्या उपाध्यक्षा दिपाली वझे, प्रतिभा टेकाडे, शर्मिला पटवर्धन, प्रभाकर सलगरे, प्रा. विजयकुमार चौधरी, मिलिंद उमाळकर, प्राचार्य व्ही टी मास्ते, राकेश शेटे, प्रवरा लिमये, संदीप लिमये, लीना पेंढारकर, नम्रता कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर साहित्यिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta