Saturday , April 18 2026
Breaking News

महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; महाप्रसादाने सांगता

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरासह उपनगरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहर परिसरातील बहुतांश मंदिरात आज सोमवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रविवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे औचित्य साधून विविध भागातील मंदिरात अभिषेक प्रवचन आणि महापूजा असे अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिर परिसर विद्युत रोषणाई आणि आकर्षक रांगोळ्यांनी सजविण्यात आला होता. कपिलेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येपासूनच कपिलेश्वर मंदिरात धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात झाली होती. मध्यरात्रीपासूनच अभिषेक पंचामृत, अभिषेक विशेष रुद्राभिषेक, त्रिकाल पूजा, पालखी, प्रदक्षिणा महाआरती असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तर आज सोमवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाशिवरात्रीनिमित्त शहर परिसरातील मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिरे फुलांनी आणि विद्युत रोषणाईने आकर्षकरित्या सजविण्यात आली होती. मंदिर कमिटीकडून महाशिवरात्रीची जय्यत तयारी करून शहरात विविध ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमी त्याचप्रमाणे आनंदनगर वडगाव येथील शिव मंदिरामध्ये देखील महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाशिवरात्रीनिमित्त दोन दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल शिव मंदिरांमध्ये पहावयास मिळाली. पहाटे अभिषेक, पूजा, आरती तसेच प्रसाद वाटप करण्यात आले. बेळगाव शहरासह कणबर्गी येथील सिद्धेश्वर मंदिर त्याचबरोबर मारुती मंदिरात देखील महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर कडोली, बेळगुंदी, बिजगर्णी अधिक ग्रामीण भागात देखील महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

About Belgaum Varta

Check Also

महिलांच्या राजकीय सक्षमीकरणाबाबत जागरूकता तसेच 33% महिलांना आरक्षण हेच भाजपचे ध्येय : माजी खासदार मंगला अंगडी

Spread the love  बेळगाव : नारी शक्ती फोरमच्या वतीने “नारी शक्ती वंदन अधिनियम” निमित्त महिलांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *