बेळगाव : गेल्या सहा वर्ष बेळगावच्या चोखंदळ ग्राहकांनी तनिष्कच्या दागिन्यांना भरघोस प्रतिसाद दिला. ग्राहकांचा विश्वास आणि पारदर्शक व्यवहार हेच तनिष्कच्या यशाचे गमक असल्याची माहिती टाटा समूहाच्या कॅरेटलेन बोर्डाचे सदस्य संदीप कुलहळी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
संतोष चांडक संचालित टाटा सुमुहातील तनिष्कच्या बेळगाव खानापूर रोड टिळकवाडी कृष्णाई आर्केड येथील नव्या भव्य आलिशान दालनाचे आज मंगळवारी शानदार उदघाटन संपन्न झाले. तनिष्क नव्या दालनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला संदीप कुलहळी यांच्यासह तनिष्कचे रिजनल मॅनेजर वासुदेवराव, टायटन ग्रुपच्या रेवती नंदन आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना संदीप कुलहळी म्हणाले, 2016 साली बेळगावात तनिष्कची सुरुवात झाली. गेल्या सहा वर्षात ग्राहकांनी दिलेला प्रतिसाद लक्षात घेऊन, ग्राहकांना अधिक प्रशस्त जागेत चांगली सेवा देण्याच्या दृष्टीने नव्या भव्य दालनात आजपासून तनिष्कचा शुभारंभ होत आहे. नव्या दालनाच्या निमित्ताने तनिष्कने ग्राहकांना दागिन्यांच्या प्रत्येक खरेदी सोबत सोन्याच्या नाण्यांची मोफत भेट दिली आहे. पाच ते सात एप्रिल दरम्यान या आकर्षक ऑफरचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे.
तनिष्कच्या नव्या स्टोअर मध्ये सोने आणि हिरे यांच्या तसेच नववधूसाठी खास तयार केलेल्या दागिन्यांच्या विशाल श्रेणी उपलब्ध आहेत. तनिष्कने ग्राहकांच्या पसंतीचा विचार करून वेळोवेळी पारंपारिक दागिन्यांची विशाल शानदार श्रेणी ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. तनिष्कचा प्रत्येक दागिना अभिजात रचना सौंदर्य, अनुभूती व समृद्ध कलात्मक असा नमुना असतो.
तनिष्क हा टाटा समूहातील ब्रँड भारतातील ग्राहकांचा सर्वाधिक पसंतीचा ब्रँड आहे. सध्या देशातील 220 पेक्षाही अधिक शहरांमध्ये तनिष्कची 380 पेक्षा जास्त एक्सक्लुसिव्ह स्टोअर्स आहेत, असेही कुलहळी यांनी स्पष्ट केले.
टायटन ग्रुपच्या रेवती नंदन यांनी टायटन वतीने बनविण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या घड्याळ उत्पादनांची माहिती दिली. वासुदेवराव यांनीही तनिष्कच्या उत्पादन संदर्भात माहिती दिली. संतोष चांडक म्हणाले, बेळगावच्या तनिष्क दालनात ग्राहकांना चांगल्यात चांगली सेवा दिली जात आहे. विश्वास आणि सचोटीच्या व्यवहार जोरावर बेळगावच्या ग्राहकांनी तनिष्कमध्ये खरेदीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. जुने दागिने गोठवून, नवे दागिने बनविण्यात बेळगावच्या तनिष्कने कर्नाटक राज्यात उच्चांक गाठला आहे, असे ही चांडक यांनी स्पष्ट केले.