Tuesday , March 3 2026
Breaking News

गुरुवर्य वि.गो.साठे मराठी प्रबोधनीतर्फे मराठी भाषा दिनानिमित्त ‘मराठी माध्यम माझी यशोगाथा’ कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : गुरुवर्य वि.गो.साठे मराठी प्रबोधिनीतर्फे दरवर्षी 27 फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षीही या दिनाच्या औचित्याने प्रबोधिनी तर्फे ‘मराठी माध्यम माझी यशोगाथा’ या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये मराठी माध्यमातून व्यवसाय व उद्योगाची उच्च शिखरे गाठणाऱ्या दापत्यांच्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बेळगाव मधील व लिओ इंजिनियर्स व एज्युकेशन फाउंडेशनचे सर्वेसर्वा जयदीप व सोनाली बिर्जे त्याचबरोबर मराठी विद्यानिकेतनचा माझी विद्यार्थी व सारस ड्रोन मेकर्स या कंपनीचे संस्थापक राहुल व अक्षता पाटील तसेच सीए पदवी प्राप्त ओमकार सुतार व त्याची पत्नी ॲड अक्षता सुतार यांच्याशी त्यांच्या शालेय जीवन, मराठी माध्यम व एकंदरीत त्याच्या यशस्वी प्रवासाविषयी मुलाखतीच्या माध्यमातून संवाद साधण्यात येणार आहे. हा कार्यक्रम गोगटे रंगमंदिर, स्कूल ऑफ कल्चर या ठिकाणी सायंकाळी ठिक ४.३० वाजता होणार असून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मराठी भाषा प्रेमी नागरिकांनी तसेच पालकांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रबोधिनीचे अध्यक्ष श्री जयंत नार्वेकर व सचिव सुभाष ओऊळकर यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *