Thursday , May 28 2026
Breaking News

मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

Spread the love

 

बेळगाव : आज 19 फेब्रुवारी रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी येळ्ळूर गावातील हिंदवी स्वराज्य युवा संघटना येळ्ळूरचे कार्यकर्ते, एस.डी.एम.सी. अध्यक्षा, उपाध्यक्ष, सदस्य व सदस्या उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ. दिव्या संदिप कुंडेकर होत्या. पहिल्यांदा मान्यवरांचे पांढरी टोपी व पुष्प देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. यांनतर छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे पूजन संघटनेचे कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार, उपखजिनदार व सर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर ध्येय मंत्र, शिवारायांची आरती प्रेरणा मंत्र म्हणून शिवगर्जना केली यांनतर शाळेचे विद्यार्थी, विद्यार्थींनी शिवचरित्रावर भाषणे, शौर्य गिते म्हटतली अशा मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे सहशिक्षक श्री. सातेरी पाखरे यांनी केले. या कार्यक्रमाला शाळेची एस.डी.एम.सी. सदस्य, सदस्या, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

इंधन दरवाढ व खतांच्या किमतींविरोधात शेतकऱ्यांचा आवाज; दर नियंत्रणाची मागणी

Spread the love  बेळगाव : पेट्रोल, डिझेल आणि खतांच्या वाढत्या किमतींमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *