Monday , September 21 2026
Breaking News

जिल्हा प्रशासनाच्यावतीने शिवजयंती निमित्त आयोजित स्वरांजली सुगम संगीत कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

 

बेळगाव : जिल्हा प्रशासन, कन्नड व संस्कृती खाते, जिल्हा पंचायत आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवाजी उद्यानात गुरूवारी सायंकाळी गायक विनायक मोरे व अक्षता मोरे यांचा “स्वरांजली” सुगम संगीत कार्यक्रम झाला.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन झाले. संस्कृती खात्याच्या अधिकारी विद्यावती बजंत्री यांनी स्वागत केले. स्वरांजली कार्यक्रमात विनायक मोरे व अक्षता मोरे यांनी शिवरायांची गीते तसेच विविध सुमधुर गीते प्रस्तुत करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांना गजानन कुलकर्णी यांनी साथसंगत दिली. त्यानंतर डॉ. सी. के. जोरापूर यांचे व्याख्यान झाले. शेवटी टी. रविंद्र शर्मा यांच्या शिष्यांचे नृत्य झाले. सुनीता देसाई यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *