Sunday , July 26 2026
Breaking News

कुर्ली शिवस्मारक संयुक्त मंडळातर्फे प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : कुर्ली येथील शिवस्मारक संयुक्त मंडळातर्फे शिवजयंतीचे औचित्य साधून प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या. त्याला परिसरातील विद्यार्थ्यांनी मधून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
शाळांमध्ये श्री शिवस्मारक संयुक्त मंडळ कुरली यांचे वतीने गुरुवारी (ता.१९) सकाळी शिवप्रतिमेचे पूजा बाळासाहेब पाटील, (निकम) किरण निकाडे, धोंडीराम चौगुले, नानासो पाटील, रप्पाटा चित्रपटाचे सिने कलाकार संकेत शंकर माळी, सपना विनायक शिंत्रे यांच्यासह विविध शाळांच्या मुख्याध्यापकांच्या असते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी शिवकालीन लाठीकाठी व दांडपट्ट्याची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी करुन दाखवली. श्री शिवछत्रपती महाराज, संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज अशा शूरवीरांचा इतिहासाची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी, यासाठी प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले. शिवस्मारक संयुक्त मंडळातर्फे शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आलेल्या प्रश्नमंजुषा या स्पर्धेमध्ये सिद्धेश्वर विद्यालय कुर्ली, मराठी मुला- मुलींची शाळा कुर्ली व दृष्टी इंग्लिश मीडियम स्कूल कुर्ली या शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावी वर्गातील ६०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. मंडळातर्फे स्पर्धेतील सहभागी सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वितरण करण्यात आले. यावेळी धोंडीराम चौगुले सर, श्री. किरण निकाडे, श्री. अमर शिंत्रे, अजित पाटील (मैराळ), राजे ग्रुप, कुर्ली, जय शिवराय मित्र मंडळ, कुर्ली व शिवस्मारक संयुक्त मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सभासद उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *