Tuesday , March 3 2026
Breaking News

मराठा समाजासाठी हजार कोटींच्या अनुदानाची मराठा समाज नेते किरण जाधव यांची मागणी

Spread the love

 

बेळगाव : मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कर्नाटक मराठा समाज विकास निगमाला किमान एक हजार कोटी रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी मराठा नेते किरण जाधव यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे केली आहे.

प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी सांगितले की, सध्या निगमाला मिळणारे अनुदान समाजाच्या वाढत्या शैक्षणिक व आर्थिक गरजांच्या तुलनेत अपुरे आहे. सामाजिक समानतेला प्राधान्य देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात अधिक निधीची तरतूद करून मराठा समाजासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी त्यांची मागणी आहे.

या निधीतून शिष्यवृत्ती योजना, उच्च व परदेशी शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य, शेती व पशुपालन क्षेत्रातील प्रोत्साहनपर योजना, तसेच बेरोजगार तरुणांना कमी व्याजदरात कर्ज सुविधा देऊन स्वयंरोजगाराला चालना देणारे कार्यक्रम राबवावेत, असेही त्यांनी नमूद केले.

राज्यात मराठा समाज अजूनही शिक्षण आणि आर्थिक क्षेत्रात विविध आव्हानांना सामोरे जात असल्याने, सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन समाजाच्या अपेक्षांना न्याय द्यावा, असे आवाहन किरण जाधव यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *