Sunday , July 26 2026
Breaking News

कुद्रेमानी येथे मोफत आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

Spread the love

 

कुद्रेमानी (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटर, बेळगाव यांच्या मार्फत आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर कुद्रेमानी येथे उत्साहात संपन्न झाले.

हनुमान मंदिर, कुद्रेमानी येथे सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत पार पडलेल्या या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये एकूण ९७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १७ रुग्णांना पुढील उपचारांसाठी संदर्भित (Ref.) करण्यात आले.

या शिबिरात डॉ. सचिन धन्नूर व डॉ. निकिता पाटील यांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला. सर्वसाधारण आरोग्य सल्ला, रक्तदाब तपासणी, रक्तातील साखरेची तपासणी, नेत्र तपासणी तसेच हाडांची तपासणी या सेवा मोफत देण्यात आल्या.

यावेळी वरिष्ठ पी.आर.ओ. म्हणून जितेंद्र पाटील यांनी समन्वयाची धुरा सांभाळली. पी.आर.ओ. राजू तिप्पण्णावर व जावेद शाहापूरकर यांनीही नियोजनात सक्रिय सहभाग घेतला. नर्सिंग स्टाफ दर्शना पत्तर यांनी रुग्णांची सेवा दक्षतेने पार पाडली.

यावेळी गावातील आशा वर्कर आरती अनंत लोहार, सुनीता यल्लाप्पा बिजगर्णीकर, नंदा शिवाजी पाऊसकर, चंद्रभागा केदारी दौलतकर यांनी घराघरांत जाऊन जनजागृती करत नागरिकांना शिबिरात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांच्या परिश्रमामुळे शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला.
या शिबिराचे यशस्वी आयोजन रवी पाटील यांनी परिश्रमपूर्वक केले. त्यांच्या पुढाकारामुळे व सर्वांच्या सहकार्यामुळे आरोग्य शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

ग्रामस्थांनी अशा सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे भविष्यातही आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *