
बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना आणि वैश्यवाणी महिला मंडळ समादेवी गल्ली बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी वैश्यवाणी वधूवर पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
गणेशपुर रोड बेळगाव येथील गंगाधरराव शानभाग हॉल (बिस्किट महादेव मंदिर) येथे आयोजित करण्यात आलेला वैश्यवाणी समाजाचा वधू-वर मेळाव्याला प्रमुख पाहुण्या म्हणून वैश्यवाणी विवाह संस्था पुणे अध्यक्षा सौ. गौरी सागर कलघटगी उपस्थित राहणार आहेत. सकाळी 8 ते 10 वधु वर नोंदणी, सकाळी 9 ते 10 अल्पोपहार, सकाळी 10.30 ते 1 वधू-वर मेळाव्याचे पहिले सत्र, दुपारी 1 ते 1.30 स्नेहभोजन आणि दुपारी 1.30 ते 5 वधू वर मेळाव्याचे दुसरे सत्र व आभार प्रदर्शन असा कार्यक्रम आहे.
या वधू वर मेळाव्याला कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, तसेच इतर विविध भागातून मोठ्या संख्येने वधू-वर व पालक उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व पालकांनी या संधीचा लाभ घेऊन आपापल्या लग्नाला इच्छुक मुला- मुलीं सहित मेळाव्याला आवर्जून उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावा असे वधू वर मेळावा कार्यक्रमाचेअध्यक्ष सुरेश पिळणकर, वैश्य वाणी समाज अध्यक्ष महादेव गावडे, सचिव विनायक शहापूरकर व कार्याध्यक्ष आनंद गावडे, महिला मंडळाच्या अध्यक्षा वर्षा सटवानी, सचिव मंजुषा देवलापूरकर, वैशवाणी युवा संघटना अध्यक्ष प्रवीण पिळणकर, सचिव रुपेश बापशेट यांनी कळविले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta