Tuesday , March 3 2026
Breaking News

आई गेली… मुलगा खचला… पण वेळेवर आलेल्या एका कॉलने मृत्यूवर मात केली!

Spread the love

 

बेळगाव :;आज शनिवार सकाळी आंबेवाडी गावातील बाबू पांडू सांबरेकर (वय ४१) हा युवक मानसिक तणावामुळे गावाच्या अगोदर असलेल्या विहिरीत पडला. पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्या आईचे निधन झाले होते आणि त्या दुःखातून तो सावरू शकला नव्हता.
स्थानिक ग्रामस्थांनी त्याला बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु अपयश आल्याने तात्काळ H.E.R.F Rescue Team ला फोन करण्यात आला.

कॉल मिळताच कोणताही विलंब न करता टीमचे प्रमुख बसवराज हिरेमठ अवघ्या ७ मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. कोणतेही विशेष रेस्क्यू साहित्य नसताना, फक्त एका दोरीच्या साहाय्याने कमरेला बांधून ते स्वतः विहिरीत उतरले. त्या व्यक्तीला धीर देत, आश्वासन देत आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी त्याला सुरक्षित आणि जिवंत बाहेर काढले.
आज अनेकदा लोक म्हणतात की रेस्क्यू टीम फक्त मृतदेह बाहेर काढते.
परंतु सत्य हे आहे की, योग्य वेळी केलेला एक कॉल एखाद्याचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो.
हा प्रसंग त्याचाच जिवंत पुरावा आहे —
✔️ वेळेवर दिलेली माहिती
✔️ त्वरित प्रतिसाद
✔️ आणि जीव वाचवण्याची जिद्द
सोळा वर्षांपासून H.E.R.F Rescue Team अहोरात्र सेवा देत आहे. प्रत्येक कॉल आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण तो एखाद्याच्या आयुष्याचा शेवट… किंवा नव्याने सुरुवात ठरू शकतो.

या धाडसी कार्याबद्दल आंबेवाडी ग्रामस्थांनी बसवराज हिरेमठ सर आणि संपूर्ण H.E.R.F Rescue Team चे मनःपूर्वक अभिनंदन करून आभार व्यक्त केले.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *