Tuesday , March 3 2026
Breaking News

सुवर्णयश मिळवलेल्या बेळगावच्या हॉकीपटूंचा लेले मैदानावर गौरव

Spread the love

 

बेळगाव : दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून बेळगावचे नाव उज्ज्वल करणाऱ्या उदयोन्मुख मुला-मुलींच्या हॉकी संघाचा शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने लेले मैदानावर सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीराम सेना हिंदुस्तान, मराठा समाज आणि समस्त मराठी भाषिकांच्या वतीने खेळाडूंचा विशेष गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम सेना हिंदुस्तानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर उपस्थित होते.

यावेळी बोलताना रणजीत चव्हाण पाटील यांनी खेळाडूंनी मिळवलेले यश हे बेळगावसाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले. “हाती घेतलेले कोणतेही काम अर्धवट सोडत नाही. बेळगावमध्ये अत्याधुनिक अ‍ॅस्ट्रोटर्फ हॉकी मैदान उभारण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू,” असे त्यांनी स्पष्ट केले.

रमाकांत दादा कोंडुसकर यांनीही खेळाडूंचे अभिनंदन करत, स्थानिक पातळीवर अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज अधोरेखित केली.

या कार्यक्रमास मराठा समाजाचे समन्वयक संजय सातेरी, माजी उपमहापौर संजय शिंदे, वडगाव महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रमुख अमोल देसाई, बेळगाव बॉडी बिल्डिंग स्पोर्ट्स अँड फेडरेशनचे कार्याध्यक्ष अनिल अंबरोळे, तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते श्रीधर खन्नूकर, सागर पाटील, मनोहर सांबरेकर, सुनील बोकडे, श्रीराम सेना हिंदुस्तानचे भरत नागरोळी उपस्थित होते.

हॉकी बेळगावचे उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर, मनोहर पाटील, तसेच प्रशिक्षक उत्तम शिंदे, कोच सुधाकर चाळके आणि कोच देशनूर सर यांचाही सत्कार करण्यात आला. मोठ्या संख्येने क्रीडापटू व पालक उपस्थित होते.

दिल्लीतील स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून बेळगावच्या हॉकी संघाने शहराच्या क्रीडाक्षेत्रात नवा इतिहास रचला असून, या यशामुळे स्थानिक खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *