Tuesday , March 3 2026
Breaking News

1 नोव्हेंबर 2024 काळ्या दिनाची पुढील सुनावणी 30 जून रोजी

Spread the love

 

बेळगाव : 1 नोव्हेंबर 2024 काळ्या दिनाच्या खटल्याच्या सुनावणीला कार्यकर्त्यांच्या गैरहजेरीमुळे जेएमएफसी द्वितीय न्यायालयाने आजची सुनावणी 30 जून रोजी निश्चित केली आहे. 2024 काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी झालेल्या समिती नेत्यांसह 40 कार्यकर्त्यांवर पुन्हा दाखल करण्यात आला होता.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती कार्याध्यक्ष मनोहर किनेकर, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांच्यासह अन्य 40 कार्यकर्त्यांवर खटला दाखल करण्यात आला आहे. या खटल्यातील काही कार्यकर्ते आज न्यायालयात अनुपस्थित राहिल्यामुळे या खटल्याला पुढील तारीख देण्यात आली आहे. ॲड. महेश बिर्जे, ॲड. मल्लेशी बोंद्रे, ॲड. वैभव कुट्रे, ॲड. बाळासाहेब कागणकर, ॲड. अश्वजीत चौधरी, ॲड. रिचमन रिची हे खटल्याचे काम पाहत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *