बेळगाव : कोरोनाविषाणूच्या फैलावामुळे कोव्हिड-19ची बाधा झालेल्या रुग्णांना अव्याहतपणे सेवा देणाऱ्या डॉ. सतिश चौलीगर यांचा सत्कार भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चा आघाडीचे राज्य सचिव किरण जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गजेश नंदगडकर आणि अभिषेक वेर्णेकर हेही उपस्थित होते.
होमिओपाथीक तज्ञ असलेले डॉ. चौलीगर हे बेळगावच्या शनिवार खुट भागात नवजीवन हॉस्पिटलचे संचालक आहेत. गेल्या काही महिन्यात आलेल्या कोव्हिड-19 च्या जागतिक महामारीच्या काळात आणि पहिली लाट, दुसरी लाट या गंभीर कालखंडात त्यांनी किमान एक हजारपेक्षा जास्त रुग्णांचे प्राण वाचवले. तसेच 200 हून अधिक रुग्णांना होम आयसोलेशनची सुविधा मिळवून देत त्यांनाही पूर्णपणे बरे केले. वैद्यकीय व्यवसायाच्या नितीमत्तेला जागत डॉ. चौलीगर यांनी रात्रंदिवस अव्याहत वैद्यकीय सेवा पुरवत एक नवा आदर्श निर्माण केला, असे सांगत किरण जाधव यांनी नवजीवन हॉस्पिटलमध्ये भेट देत डॉ. चौलीगर यांचा सत्कार केला. एक प्रकारे कोव्हिड-योद्धा असल्यासारखेच काम डॉक्टरांनी केल्याने त्यांचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta