चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : देशभर कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही. तसेच कोल्हापूर जिल्ह्यासह चंदगड तालुक्यात रुग्ण संख्या अजूनही जास्तच आहे. तरी अशा परिस्थितीत रुग्णांना रक्त तुटवडा जाणवत आहे. तरी हा रक्त पुरवठा सुरळीत होऊन जास्तीत जास्त रक्त संकलन व्हावे या उद्देशाने चंदगड पोलीस ठाणे, ‘मिशन संवेदना’अंतर्गत मंगळवारी (२९ जून २०२१ रोजी) सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांचे उपस्थितीत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तरी चंदगड तालुक्यातील सर्व तरुण मंडळे, ग्रामपंचायत, ग्रामस्थांनी या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन एक कोरोना योद्धा म्हणून या संकटकाळात आपली जबाबदारी पार पाडून सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी केले आहे.
Check Also
मतदान केंद्र येती घरा….
Spread the love कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व 10 विधानसभा मतदारसंघात गृहमतदानाला सुरुवात कोल्हापूर (जिमाका) : महाराष्ट्र …