Sunday , September 20 2026
Breaking News

‘मिशन संवेदना’ अंतर्गत उद्या चंदगड पोलीसांच्यावतीने रक्तदान शिबिर…

Spread the love

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : देशभर कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही. तसेच कोल्हापूर जिल्ह्यासह चंदगड तालुक्यात रुग्ण संख्या अजूनही जास्तच आहे. तरी अशा परिस्थितीत रुग्णांना रक्त तुटवडा जाणवत आहे. तरी हा रक्त पुरवठा सुरळीत होऊन जास्तीत जास्त रक्त संकलन व्हावे या उद्देशाने चंदगड पोलीस ठाणे, ‘मिशन संवेदना’अंतर्गत मंगळवारी (२९ जून २०२१ रोजी) सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांचे उपस्थितीत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तरी चंदगड तालुक्यातील सर्व तरुण मंडळे, ग्रामपंचायत, ग्रामस्थांनी या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन एक कोरोना योद्धा म्हणून या संकटकाळात आपली जबाबदारी पार पाडून सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

साहित्यरत्न, विचारवंत कॉमेड अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव कोल्हापूरात सन्मानित

Spread the love  कोल्हापूर : ठाणे शहरातील नव्या दमाचे नव्या उमेदीचे समाजातील विविध स्तरांतील विषयावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *