बेंगळूर : विशेष तपास पथकाने (एसआयटी) मंगळवारी भाजप नेते रमेश जारकीहोळी यांच्या लैंगिक टेप प्रकरणातील कथित सहभागाचा अहवाल कर्नाटक उच्च न्यायालयात सादर केला. २ मार्च रोजी हे कथित लैंगिक प्रकरण उघडकीस आले होते, तेव्हा सामाजिक कार्यकर्ते कल्लहळ्ळीने माजी राज्यमंत्र्यांसह लैंगिक सीडी प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पोलिसात केली होती.
“संबंधित माजी मंत्र्याने पीडित महिलेला कर्नाटक पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेड (केपीटीसीएल) मध्ये नोकरीची ऑफर दिली होती.यानंतर महिला पूर्वनिर्धारित ठिकाणी पोहोचल्यानंतर महिलेवर लैंगिक अत्याचार केले गेले आणि आता मंत्री आणि त्याच्या लोकांकडून तिला धमकावले जात आहे,” असा आरोप कल्लहळ्ळीने केला होता.
दरम्यान, सेक्स सीडी प्रकरणात मंत्री महिलेशी तडजोड करणार्या स्थितीत दिसून आले. जारकीहोळी यांनी एका महिलेनी लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून ३ मार्च रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पण जारकीहोळी यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावत व्हिडिओ बनावट असल्याचे म्हटले आहेत