खानापूर : धर्मस्थळ स्वसहाय्य संघाचा तालुकास्तरीय महिला मेळावा खानापूर येथील शनाया गार्डन येथे काल दि. 21 सप्टेंबर रोजी पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून खानापूर तालुक्याच्या माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. अंजली निंबाळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी बोलताना डॉ. अंजलीताई निंबाळकर …
Read More »शाळा वाचवण्यासाठीच्या आंदोलनाला माजी आमदार अंजलीताई निंबाळकर यांचे समर्थन
खानापूर : माजी आमदार आणि एआयसीसीच्या सचिव डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांच्याशी चर्चा करून इटगी येथील सरकारी शाळेचा प्रश्न सोडवला. त्यांच्या मध्यस्थीमुळे विद्यार्थ्यांचे व ग्रामस्थांचे आंदोलनही समाप्त झाले. डॉ. अंजली निंबाळकर यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात त्यांनी इटगी येथे सरकारी शाळा सुरु केली होती. आणि नंतर ती हायस्कूलमध्ये …
Read More »म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय येथील खो-खो खेळाडू जिल्हास्तरीय अजिंक्य!
खानापूर : मराठा मंडळ संचालित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर विद्यार्थिनींच्या अंगभूत कौशल्यावर अधिक भर देणारे कॉलेज म्हणून प्रसिद्ध आहे. येथे विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रगती बरोबर क्रीडा कौशल्याकडे जातीने लक्ष दिले जाते! मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर खेळाडू विद्यार्थ्यांसाठी मराठा मंडळ शिक्षण संस्थेमध्ये विविध क्रीडा उपक्रम राबविले …
Read More »इनर व्हील क्लब खानापूरकडून रवळनाथ हायस्कूल, शिवठाणला पाण्याची टाकी भेट
खानापूर : तालुक्यातील मौजे शिवठाण येथील श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्था संचलित रवळनाथ हायस्कूलला इनर व्हील क्लब, खानापूरतर्फे विद्यार्थ्यांच्या उपयोगासाठी स्वच्छ पाण्याची टाकी भेट देण्यात आली. कार्यक्रमास क्लबच्या अध्यक्षा सौ. वर्षा सुरेश देसाई, सेक्रेटरी सौ. सविता कल्याणी, एडिटर सौ. साधना पाटील, आयएसओ सौ. प्रियांका हुबळीकर, मेंबर सौ. गंधाली देशपांडे, माजी …
Read More »युवा समितीच्या वतीने खानापूर तालुक्यातील विविध सरकारी मराठी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप
खानापूर : खानापूर तालुक्यातील प्रत्येक सरकारी मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पोहोचविण्याचे चांगले कार्य महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे करण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यास निश्चित मदत होईल असे प्रतिपादन खानापूर तालुका समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे. शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यापासून खानापूर तालुक्यातील …
Read More »विद्यार्थी आणि प्रवाशांचे जीव धोक्यात घालू नका
आगारप्रमुख, ड्रायव्हर, कंडक्टरना गर्लगूंजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांनी धरले धारेवर! खानापूर : बस आगार प्रमुख आणि त्यांच्या सहकारी यांच्या दुर्लक्ष्यामुळे काही बसेसच मेंटेनेन्स, रिपेअर वेळेत न झाल्यामुळे बसेसचे कंट्रोल बोर्ड, ब्रेक्स, स्टेक्स, छत असे भाग निकामी झालेले दिसून येतात त्यामुळे बसेस मधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थी आणि नागरिकांचे …
Read More »गुंजी ग्रामपंचायतचा सावळागोंधळ; काँक्रीटवर पुन्हा पेव्हर्स घालण्याचा प्रकार!
सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र मादार यांची तालुका पंचायतला तक्रार खानापूर : मागील तीन-चार वर्षांपूर्वी गुंजी ग्रामपंचायतच्या आवारात काँक्रिटीकरण करून सुसज्य रस्ता व परिसर सुंदर करण्यात आला आहे असे असताना याच काँक्रिटीकरणावर पुन्हा लाखो रुपये खर्च करून पेव्हर्स बसवण्याचा घाट गुंजी ग्रामपंचायतने घातला आहे. नुकताच या पेव्हर्स बसवण्याच्या कामाचे पूजनही ग्रामपंचायत …
Read More »धर्म “हिंदू”, जात “मराठा”, उपजात “कुणबी” आणि मातृभाषा “मराठी” अशी नोंद करावी : आमदार विठ्ठल हलगेकर
खानापूर : २२ सप्टेंबर ते 7 ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात जातनिहाय जनगणना सर्वेक्षण सुरू होणार असून खानापूर तालुक्यातील मराठा समाजाने स्वत:ची माहिती देतांना धर्म “हिंदू”, जात “मराठा”, उपजात “कुणबी” आणि मातृभाषा “मराठी” असा उल्लेख सर्व मराठा बांधवांनी करावा असे आवाहन खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केले. आज येथील शिवस्मारकात सकल मराठा …
Read More »हंदूर येथे अज्ञातांनी दोन दुचाकी जाळल्या…
खानापूर : काल रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास घराच्या बाहेर लावलेल्या दोन दुचाकी एक होंडा व दुसरी सुझुकी अशा दोन दुचाकी जळून खाक झाल्या असून अज्ञात व्यक्तींनी हे दुष्कृत्य केले आहे. सद्दाम अस्लम सय्यद यांच्या या दोन दुचाकी होत्या. समजा घराने पेट घेतला असता तर मात्र अजून जास्त अनर्थ घडला …
Read More »श्री ओमकार मल्टीपर्पज सौहार्द सहकारी संघ नि., गर्लगुंजीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
गर्लगुंजी : श्री ओमकार मल्टीपर्पज सौहार्द सहकारी संघ नियमित गर्लगुंजी या सहकारी पतसंस्थेची अकरावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पाडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन श्री. अनंत ज्योतिबा मेलगे आणि उपाध्यक्ष स्थानी श्री. नामदेव परशराम धामणेकर त्यांनी विराजमान होते. दिनांक 31 मार्च 2025 अखेरीस संस्थेकडे एकूण सभासद 570 आहेत. संस्थेकडे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta