खानापूर : महिलांना रोजच्या व्यावहारिक जीवनातून थोडा निवांतपणा मिळावा, विचारांची देवाणघेवाण करता यावी यासाठी हळदीकुंकूच्या निमित्ताने सर्व महिला एकत्र येतात. त्यासाठी हळदीकुंकूसारखे कार्यक्रम करणे गरजेचे आहे, असे भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या. नियती फौंडेशच्या वतीने मकरसंक्रांतीचे औचित्य साधून इटगी येथे हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. नियती फौंडेशनच्या …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हुतात्म्यांना अभिवादन!
खानापूर : वैयक्तिक हेवेदावे विसरून समितीला बळकटी देणे व आमिषाना बळी पडून राष्ट्रीय पक्षाकडे गेलेल्या तरुणाईला समितीच्या मुख्य प्रवाहात आणून सीमाप्रश्न लवकरात लवकर सोडवून घेणे हीच खरी हुतात्म्यांना श्रद्धांजली, असे मत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी हुतात्म्यांना अभिवादन करत व्यक्त केले. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण …
Read More »जटगे येथे रविवारी होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेची जनजागृती
खानापूर : जटगे ता खानापूर येथे रविवार दि. 22-1- 2023 रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धा होणार असून त्याकरिता जटगे परिसरातील कामतगे, शिंपेवाडी, भालके के एच भटवाडा, आदी शाळांना भेट देऊन तेथील एसडीएमसी कमिटी, नागरी अभियान कार्यकर्ता, महिला वर्ग यांना खेळाचे महत्व व मॅरेथॉन ला सहभागी होणे, याविषयी सविस्तर माहिती सांगून …
Read More »खानापूरात फेब्रुवारीत कुस्ती आखाड्याचे आयोजन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूरपासून जवळ असलेल्या के. पी. पाटील नगरात श्री साई प्रतिष्ठान व खानापूर तालुका कुस्ती आखाड्याच्यावतीने कर्नाटक राज्याचे शिवसेना उपाध्यक्ष के. पी. पाटील यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त येत्या १० फेब्रुवारी रोजी भव्य कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बरगाव फाट्याजवळील के. पी. नगरात आयोजित पत्रकार …
Read More »हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यासंदर्भात खानापूरात जनजागृती
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आज 16 जानेवारी रोजी खानापूर शहरात पत्रके वाटून 17 जानेवारी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली. तर संध्याकाळी निडगल व गर्लगुंजी येथे खानापूर म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनजागृती करण्यात आली. 17 जानेवारी रोजी सकाळी ठीक 10 वाजता …
Read More »खानापूर हॉस्पिटलच्या सिनियर हेल्थ केअर अधिकारी ललिता गडकर सेवानिवृत्त
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर सरकारी हॉस्पिटलच्या सिनियर हेल्थ केअर अधिकारी सौ. ललिता यशवंत गडकर या ३७ वर्षांच्या सेवेतून निवृत झाल्या. त्यानिमित्त खानापूर सरकारी हाॅस्पिटलचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय नांद्रे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. यावेळी निवृत्त शिक्षक गणपत नार्वेकर यांनी प्रास्ताविक …
Read More »उद्या हुतात्म्यांना अभिवादन!
बेळगाव : 1956 संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मंगळवार दि. 17 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी मराठी भाषिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे. हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन केल्यानंतर हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, …
Read More »खानापूर तालुका म. ए. समितीतर्फे जनजागृती
खानापूर : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हौतात्म्य प्राप्त झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन करून हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यासाठी खानापूर तालुका म. ए. समितीतर्फे जनजागृती दौरा करण्यात आला. एकी प्रक्रियेला यशप्राप्ती झाल्यानंतरच्या पहिल्या जनजागृती दौऱ्याची सुरवात हब्बनहट्टी येथील स्वयंभू मारुती मंदिर येथे दर्शन घेऊन करण्यात आली. त्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली …
Read More »मराठा मंडळ खानापूर येथील विविध संघाच्यावतीने होनकल येथील मराठी शाळेत मोफत दंत तपासणी
खानापूर : येथील मराठा मंडळ संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील कॉमर्स फोरम (वाणिज्य संघ), माजी विद्यार्थी संघटना, इंडियन डेंटल असोसिएशन बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी, दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. होनकल ता. खानापूर येथील सरकारी मराठी मुला-मुलींची शाळा मराठा मंडळ महाविद्यालयाच्या कॉमर्स फोरमने दत्तक …
Read More »कराटे स्पर्धेमध्ये खानापूरला सुयश
खानापूर : रविवार दिनांक 8 जानेवारी 2023 रोजी बेळगाव पिरनवाडी येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात झालेल्या दुसऱ्या ओपन स्पर्धेत कराटे चॅम्पियनशिप मध्ये 300 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. या कराटे स्पर्धेमध्ये खानापूर कराटे अकादमी 5 स्पर्धकांनी भाग घेतला होता यामध्ये कुमारी निहिरा परशराम नाथ हिला बेळगाव जिल्हा गोल्ड मेडल, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta