जांबोटी विद्यालयाने राबविले गावोगावी उपक्रम खानापूर : जांबोटी परिसरात अनेक खेड्यात नवरात्र उत्सव जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा झाला. या उत्सवादरम्यान जांबोटी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनेक खेड्यात समतोल आहाराचे महत्त्व पटवून देण्याचे काम केले. कापोली (के.सी.), कुसमळी, राजवाडा, रामापुर पेठ, हब्बनहट्टी, मुडगई, चिखले आदी खेड्यात भजन -प्रवचन, दौड, रास दांडिया सुरु असलेल्या …
Read More »करंबळ गावात दुर्गा माता दौडची सांगता
खानापूर (प्रतिनिधी) : करंबळ (ता. खानापूर) येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे श्री दुर्गामाता दौडीची समाप्ती उत्साहात झाली. करंबळ गावामध्ये घटस्थापना ते दसरापर्यंत करंबळ, रुमेवाडी, जळगे, देवनगर, रुमेवाडी क्रॉस, होनकल, गंगवाळी, कौंदल व शिंदोळी या गावांमध्ये श्री दुर्गामाता दौड पोहोचविण्यात आली व या श्री दुर्गामाता दौडीची समाप्ती करंबळ गावांमध्ये करण्यात आली. प्रारंभी …
Read More »माण रस्त्यासाठी जांबोटीत गावकऱ्यांचा रास्तारोको
खानापूर : गावाकडे जाणाऱ्या खराब रस्त्याबरोबर चोर्ला मार्गे बेळगाव-गोवा रस्त्याच्या दुरावस्थेच्या विरोधात माण गावातील ग्रामस्थांनी आज गुरुवारी सकाळी जांबोटी येथे रास्ता रोको आंदोलन केले. जांबोटी, कणकुंबी व आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनीही रास्ता रोकोमध्ये मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला. जांबोटी येथे ग्रामस्थांनी रास्ता रोको केल्यामुळे या महामार्गावरील वाहतूक तासभर विस्कळीत झाली होती. …
Read More »खानापूरात विश्व हिंदू परिषद, बजरंग दलच्यावतीने शस्त्र पुजन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने खानापूरातील मऱ्याम्मा मंदिर हलकर्णी क्रॉस येथे शस्त्र पूजेचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी सनातन संस्थेचे साधक कोनेरी कुमरतवाडकर यांचे शस्त्र पूजनचे महत्व आणि आजचे चाललेले याचे दिखाविकरण याबद्दल मार्गदर्शन ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषदेचे …
Read More »कोडचवाडात दुर्गामाता दौडची सांगता
खानापूर (प्रतिनिधी) : कोडचवाडात (ता. खानापूर) येथे दुर्गामाता दौडची सांगता करण्यात आली. यावेळी बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या हस्ते दुर्गामाता दौडची सांगता करण्यात आली. गेल्या आठ दिवसांपासून नवरात्र महोत्सव निमित्ताने सुरू असलेल्या दुर्गामाता दौडला आमाप प्रतिसाद मिळाला होता. यावेळी कोडचवाडातील युवकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता गावात भगवेमय …
Read More »चिगुळे – कोदाळी रस्त्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांना निवेदन
खानापूर (तानाजी गोरल) : महाराष्ट्र , कर्नाटक सीमेलगतच्या गावासाठी महाराष्ट्र सरकारने आपल्या हद्दीत रस्ता करावा, यासाठी खानापूर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूरचे राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक यांना कोल्हापूर येथे भेटून रस्त्यासंदर्भात निवेदन दिले. कणकुंबी, चिगुळे, कोदाळी येथे फेब्रुवारी २०२३ मध्ये गंगा भागिरथी यात्रा होणार आहे. या यात्रेत गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक तिन्ही …
Read More »खानापूर तालुका म. ए. समितीची महत्वपूर्ण बैठक शुक्रवारी
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक ७ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी एक वाजता राजा शिवछत्रपती स्मारक भवन मधील माजी आमदार कै. व्ही. वाय. चव्हाण सभागृहात आयोजित केली आहे. तरी तालुक्यातील सर्व समितीप्रेमी नागरिकांनी व आजी-माजी लोकप्रतिनिधींनी वेळेत उपस्थित राहावे, असे महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी …
Read More »बिष्टम्मा देवीच्या चरणी आमदार अंजलीताई निंबाळकर!
खानापूर : आज दुपारी खानापूरच्या कार्यसम्राज्ञी आमदार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी कक्केरी येथे जाऊन बिष्टाम्मा देवीचे दर्शन करून आशिर्वाद घेतले. खानापूर तालुक्यातील सामान्य जनता, कष्टकरी, कामगार वर्ग, शेतकरी, या सर्वांचे जनजीवन सुखकर व्हावे असे देवीकडे साकडे घातले असल्याचे आमदार ताई म्हणाल्या. आमदार अंजलीताईंनी देवीची ओटी भरली. मंदिर कमिटीतर्फे आमदार …
Read More »इदलहोंड ग्रा. पं. अध्यक्ष चांगाप्पा बाचोळकरानी स्वखर्चातून केली इदलहोंड रस्त्याची दुरूस्ती
खानापूर (प्रतिनिधी) : इदलहोंड (ता. खानापूर) गावच्या इदलहोंड ते बेळगांव पणजी महामार्गाच्या फाट्यापर्यतच्या रस्त्याची दुरावस्था झाली होती. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशातून तसेच वाहन धारकातून तसेच दुचाकी वाहन धारकातून कमालीची नाराजी पसरली होती. या रस्त्याच्या दुरूस्तीबाबत ग्राम पंचायत अध्यक्ष चांगाप्पा बाचोळकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदनही देण्यात आले होते. मात्र संबंधित …
Read More »गुंजी माउली देवी यात्रोत्सव उद्यापासून; बैल पळविण्याचा कार्यक्रम बंद होणार!
खानापूर (तानाजी गोरल) : गुंजी माउली देवी यात्रोत्सवात परंपरागत पद्धतीने दरवर्षी पालखी प्रदक्षिणेनंतर गुजी पंचक्रोशीतील शेतकरी आपल्या बैलजोड्या शृंगारून मंदिराभोवती पळविण्याची प्रथा आहे. माउली देवी हे पंचक्रोशीतील आराध्य दैवत असून वर्षभर बैलजोडीचे संरक्षण व्हावे, कोणत्याही प्रकारची रोगराई किंवा बापा बैलजोडीला होऊ नये म्हणून येथील शेतकरी माउली देवीला नवस बोलतात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta