Monday , September 21 2026
Breaking News

कौंदलात उद्या श्री माऊली देवी कार्तिकोत्सव सोहळा

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : कौंदल (ता. खानापूर) येथे सालाबादप्रमाणे यंदा ही शनिवारी दि. ५ रोजी श्री माऊली देवी कार्तिकोत्सव सोहळा साजरा होत आहे.
यानिमित्त विविध विधीवत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत श्री माऊली देवीची गावांतून वाजत गाजत मिरवणूक त्यानंतर दुपारी १ तेे ३ पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
संध्याकाळी ६ वाजता श्री माऊली देवीचा कार्तिकोत्सव सोहळा व आरती कार्यक्रम, सायंकाळी ७.३० वाजता श्री हनुमान कार्तिकोत्सव व तुळशी विवाह.
रात्री ९ वाजता महाप्रसाद होऊन उत्सवाची सांगता होणार आहे. तरी भाविकांनी सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन कौंदल ग्रामस्थाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *