खानापूर : सीमाभागात सुरू असलेल्या कन्नडसक्ती विरोधात तसेच मराठी भाषिकांना मराठी भाषेमध्ये परिपत्रके मिळावीत यासाठी 11 ऑगस्ट रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे, यासंदर्भात विचारविनिमय करण्यासंदर्भात खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक रविवार दि. 3 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता शिवस्मारक …
Read More »कुंबेली तपासणी नाक्यावरील वनाधिकाऱ्याकडून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार!
रामनगर : कुंबेली तपासणी नाक्यावरील वनाधिकाऱ्याने एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घृणास्पद घटना रामनगर येथे घडली असून नराधम वनाधिकाऱ्याला अटक करून कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. लिंगप्पा लमाणी (वय ४५, रा. विजयपूर) असे या नराधम वनाधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, ओडिशा येथून आलेले एक …
Read More »गर्लगुंजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांच्या प्रयत्नांना यश
बेळगाव : गर्लगुंजी, निट्टुर, तोपिनकट्टी, बरगाव, बैलुर या गावांतील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून केएलई शताब्दी चॅरिटेबल हॉस्पिटल बेळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत देसाई आणि गर्लगुंजी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाटील यांच्यात प्रदीर्घ चर्चा होऊन केएलई शताब्दी चॅरिटेबल हॉस्पिटल सदर गावाना दत्तक घेणार असल्याची माहिती गर्लगुंजी ग्रा. पं. सदस्य प्रसाद पाटील दिली. …
Read More »मातृभाषेतून शिक्षण घेतलेले विद्यार्थीही उच्च पदावर पोहोचू शकतात : कॅप्टन नितीन धोंड यांचे प्रतिपादन
मराठी भाषा प्रेरणा मंचच्या वतीने दहावी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण जांबोटी : मातृभाषेतून शिकलो म्हणून विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड बाळगू नये, मराठी माध्यमातून शिकलेलली मुले ही प्रभावी इंग्रजी बोलू शकतात, तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे उच्च पदावर कार्य करून आपला ठसा उमटू शकतात, याची बरीचशी उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर असुन त्यांचा आदर्श आजच्या …
Read More »खानापूर महामार्गाच्या कामात विलंब : कंत्राटदाराला ३.२ कोटी रुपयांचा दंड
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील खानापूर ते गोवा सीमेपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाच्या (एनएच ७४८) बांधकामात झालेल्या विलंबाबद्दल कंत्राटदारांना ३.२ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचे केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान लेखी उत्तर देणाऱ्या मंत्र्यांनी सांगितले की, या दुहेरी मार्गाच्या प्रकल्पाची लांबी ५२ किमी आहे …
Read More »खानापूरजवळ दुधाचा टेम्पो उलटून विद्यार्थी किरकोळ जखमी
खानापूर : आज सकाळी खानापूर तालुक्यातील हलसाल, बिजगर्णी (माचीगड) परिसरातून विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस माचीगड येथे नादुरुस्त झाल्याने काही विद्यार्थी दुधाच्या टेम्पोमधून प्रवास करत होते. टेम्पो नंदगडच्या दिशेने जात असताना एका नाल्यावरील पुलावर चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो उलटला. यात काही विद्यार्थी नाल्याच्या पाण्यात तर काही रस्त्यावर पडून …
Read More »मराठी भाषा प्रेरणा मंचतर्फे खानापूर तालुक्यातील गुणी विद्यार्थ्यांचा शुक्रवारी गौरव
ओलमनी शाहू हायस्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन जांबोटी : मराठी भाषा प्रेरणा मंच बेळगाव यांच्या वतीने खानापूर तालुक्यातील मराठी माध्यमातून दहावी उत्तीर्ण झालेल्या पहिल्या 10 विद्यार्थ्यांचा गुणगौरव व रोख पारितोषिक वितरण कार्यक्रम शुक्रवार दिनांक 25 रोजी ओलमणी येथील राजर्षी शाहू हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. मराठी भाषा प्रेरणा मंच बेळगाव च्या …
Read More »गर्लगुंजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद विठ्ठल पाटील त्यांच्याकडून “त्या” शेतकऱ्याला आर्थिक मदत!
खानापूर : बेकवाड (तालुका खानापूर) येथील शेतकरी गुंजाप्पा विठ्ठल पाटील या शेतकऱ्याची बैलजोडी बुधवार दिनांक 16 जुलै रोजी बेकवाड येथील तलावामध्ये बुडून मरण पावली होती. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखों रुपयांचे आर्थिक नुकसान झाले होते. याबाबत गर्लगूंजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद विठ्ठल पाटील यांनी बेकवाड या ठिकाणी श्री.गुंजाप्पा पाटील या शेतकऱ्यांच्या …
Read More »खानापूर पोलिसांकडून चोरीच्या विविध घटनांचा तपास; १५ लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत…
खानापूर : गेल्या काही महिन्यांपासून खानापूर परिसरात झालेल्या विविध चोरीच्या घटनांचा खानापूर पोलिसांनी यशस्वीपणे तपास लावला आहे. वेगवेगळ्या चार ठिकाणी झालेल्या चोरीच्या प्रकरणांचा पोलिसांनी तपास करत आरोपींकडून १४ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. जप्त केलेला हा मुद्देमाल आणि आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस …
Read More »युवा समितीच्या वतीने शिरोली ता.खानापूर सी. आर. पी मधील विविध शाळांना शैक्षणिक साहित्याचे वितरण
खानापूर : खानापूर तालुक्यातील शिरोली विभाग सी. आर. पी मधील हेम्मडगा, जामगाव, डोंगरगाव, गवाळी, आबनाळी, पाली, कोंगळे, मेंडील, नेरसे, सायाचिमाळ, चापवाडा, हनबरवाडा, पास्तोली, शिरोली, शिरोलीवाडा, तेरेगाळी, मेंगिणहाळ, तिवोली या शाळांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रम शिरोली मराठी प्राथमिक शाळा येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरोली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta