Tuesday , September 17 2024
Breaking News

खानापूर

निरंजन सरदेसाई यांच्या खानापूर येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन उद्या

  खानापूर : कारवार लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या खानापूर येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन रविवारी दुपारी चार वाजता होणार आहे. वर्दे पेट्रोल पंप शेजारी सरदेसाई यांच्या कार्यालयाचे उद्घाटन होणार असून यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती व खानापूर तालुका समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी समितीच्या …

Read More »

समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या प्रचाराचा शुभारंभ

  खानापूर : कारवार लोकसभा मतदार संघात यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीची ताकद दिसून येईल तसेच कणकुंबी आणि परिसरात समितीला मताधिक्य मिळेल, असे प्रतिपादन समितीचे ज्येष्ठ नेते मारुती परमेकर यांनी व्यक्त केले आहे. कारवार लोकसभा मतदार संघातील समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या प्रचाराचा शुभारंभ शुक्रवारी कणकुंबी येथील माऊली देवी मंदिर येथून …

Read More »

कारवारमधून समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांचा अर्ज दाखल

  खानापूर : कारवार लोकसभेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार निरंजन उदयसिंह सरदेसाई यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. कारवार लोकसभा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौ. मानकर यांच्याकडे रीतसर उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी, नंदगड विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे उपाध्यक्ष रमेश धबाले, महाराष्ट्र एकीकरण …

Read More »

डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचा आज खानापूर दौरा; निट्टुर, इदलहोंड, गर्लगुंजी गा. पं. ना देणार भेट!

  खानापूर : उत्तर कन्नड (कारवार) लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचा उद्या बुधवार दि. 17 रोजी खानापूर तालुक्यातील काही प्रमुख ग्रामपंचायतीना भेट देण्याचा दौरा होणार आहे. सकाळी 8 वाजता पहिली भेट निट्टुर ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांसाठी राहणार आहे. या ठिकाणी कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले आहे. …

Read More »

बेळगाव तालुक्यातील कलखांब गावचा सुपुत्र राहुल पाटील यांनी फडकवला युपीएससी परीक्षेत झेंडा…

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कलखांब या एका छोट्याशा खेड्यातील विद्यार्थी राहुल जयवंत पाटील याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादित करून बेलगावकरांच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. सुरवातीपासूनच एक हुशार विद्यार्थी म्हणून परिचित असलेला राहुल याने वनिता विद्यालय हायस्कूलमधून दहावी झाल्यानंतर आरएलएस कॉलेजमधून बारावी उत्तीर्ण झाला त्यानंतर …

Read More »

कारवारमधून डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचा शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल

  कारवार : कारवार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी शक्तीप्रदर्शनाने आज आपला उमेदवारी अर्ज भरला. उत्तर कन्नड जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना आपला उमेदवारी अर्ज सादर केला. तत्पूर्वी त्यांनी कारवार येथील सिद्धिविनायक पुरातन आणि ऐतिहासिक अशा देवस्थानांना भेटी देऊन दर्शन घेऊन पुजन केले. आज सकाळी जिल्हाभरातून आलेल्या …

Read More »

बॅलेट पेपरवर मराठीतून नावे समाविष्ट करा

  खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघात मराठी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे बॅलेट पेपरवर मराठीतून नावे समावेश करावी तसेच माहिती आणि मतदार यादी मराठी भाषेतून उपलब्ध करून द्यावी अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने कारवारच्या जिल्हाधिकारी गंगुबाई मानकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कारवार लोकसभा मतदार संघातील खानापूर, …

Read More »

कारवार मतदासंघातून निरंजन सरदेसाई यांचा अर्ज दाखल

  खानापूर : कारवार लोकसभा मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निरंजन सरदेसाई यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी अर्ज दाखल करण्यासाठी कारवार येथे मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा देत कारवार वासियांचे लक्ष वेधून घेतले. अर्ज दाखल करण्यासाठी रवाना …

Read More »

डॉ. अंजलीताई निंबाळकर उद्या अर्ज भरणार!

    खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर उद्या मंगळवार दि.16/04/224 रोजी सकाळी 10.30 वाजता कारवार जिल्हाधिकारी कार्यालयात शक्तिप्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून काँग्रेसकडून त्याची जोरदार तयारी सुरू करण्यात येत आहे. यावेळी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. पहिल्यांदाच खानापूर तालुक्याला लोकसभेची …

Read More »

खानापुर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

  खानापुर : खानापुर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले आहे. प्रारंभी खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना सरदेसाई यांनी मराठी भाषिकांचे हक्क अबाधित राखणे हे सरकारचे …

Read More »