Sunday , December 14 2025
Breaking News

खानापूर

डीसीसी बँकेची खानापूर शाखा वादाच्या भोवऱ्यात….

  खानापूर : बेळगाव डीसीसी बँकेच्या खानापूर शाखेबाबत सध्या शहरात वेगवेगळी चर्चा सुरू आहे. सदर शाखा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. डीसीसी बँकेच्या एका संचालकाच्या हेकेखोरपणामुळे शेतकऱ्याचे नुकसान होत असल्याचा आरोप एका शेतकऱ्याकडून केला जात आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील सुरेश दंडगल नामक शेतकरी बँकेत पैसे काढण्यासाठी गेले …

Read More »

पर्यावरण जपणं ही जबाबदारी नाही तर जीवनशैली असायला हवी : डॉ. शिवाजी कागणीकर यांचे प्रतिपादन

  खानापूर : ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून “पर्यावरण आणि माझी जबाबदारी” या विषयावर डॉ. शिवाजी कागणीकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष काॅलेजचे प्राचार्य अरविंद पाटील होते. व्यासपीठावर मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे संचालक श्री. शिवाजीराव पाटील, ताराराणी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. राहूल जाधव व …

Read More »

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्री रवळनाथ हायस्कूलमध्ये चर्चासत्र

  खानापूर : तालुका खानापूर श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ येळ्ळूर संचलित श्री रवळनाथ हायस्कूल शिवठाण येथे पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष रोपण कार्यक्रम तसेच पर्यावरण स्वच्छ व संरक्षणाचे महत्त्व जंगले व वन्यजीव सूक्ष्मजीव कीटक यांचे पर्यावरणातील महत्त्व व योगदान या विषयावर विद्यार्थ्यांना ज्ञानात भर पडावी यासाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. व्यासपीठावर …

Read More »

खानापूर तहसील कार्यालयातील सर्वेअरला लोकायुक्त पोलिसांनी लाच घेताना रंगेहात पकडले

  खानापूर : खानापूर तहसील कार्यालयातील भू-दाखले विभागातील सहाय्यक संचालकांच्या कार्यालयातील एका सर्वेअरवर छापा टाकत त्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खानापूर तालुक्यातील कुटिनो नगर क्षेत्रातील मन्सापूर गावचे रहिवासी सदाशिव कांबळे यांच्याकडून पी.टी. शीट तयार करून देण्यासाठी सर्वेअर विनोद संबन्नी यांनी रु. ४५०० लाच मागितली होती. या प्रकाराविरोधात …

Read More »

हुतात्मा दिन गांभीर्याने पाळा; खानापूर तालुका म. ए. समितीचे आवाहन

  खानापूर : 1 जून 1986 च्या कन्नड शक्ती आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी हुतात्मा स्मारक हिंडलगा येथे समितीप्रेमी मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी केले. 30 मे रोजी झालेल्या खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत ते बोलत …

Read More »

शिवस्वराज संघटनेतर्फे कृषी अधिकाऱ्यांना निवेदन वजा इशारा…

  खानापूर : खानापूर तालुक्यातील शेतकरी वर्गाला आवश्यक त्या खतांचा पुरवठा वेळेत आणि योग्य दरात करण्यात यावा यासाठी शिवस्वराज फाऊंडेशन आक्रमक. खानापूर तालुक्यात मान्सूनला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठी व उसाला खते घालण्यासाठी घाई गडबड सुरू आहे. अशा काळात तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाला आवश्यक असलेले खत उपलब्ध होत नसल्याने कामे खोळंबताना दिसत …

Read More »

“आमची नदी आमचा हक्क” संघटनेच्यावतीने 3 जून रोजी मोर्चा

  खानापूर : कळसा भांडूरा प्रकल्पामुळे पश्चिम घाटातील भीमगड अभयारण्य वनसंपदा तसेच जैवविविधतेला धोका निर्माण झाला असून या प्रकल्पामुळे उत्तर कर्नाटकाला वाळवंटाचे स्वरूप प्राप्त होणार आहे. खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदी सुमारे 1500 किलोमीटर वाहत जाते आणि समुद्राला मिळते. त्याचप्रमाणे म्हादाई, कळसा भांडूरा, अघनाशिनी या नद्या देखील नैसर्गिकरित्या समुद्राला जाऊन मिळतात. …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची बैठक शुक्रवार दिनांक ३० मे २०२५ रोजी दुपारी दोन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी १ जून १९८६ रोजी कन्नड सक्ती आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या व सीमाप्रश्नासाठी आहुती दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी बैठक बोलावलेली आहे. तरी …

Read More »

खानापूर तालुक्यातील जंगल, धबधब्यांच्या ठिकाणी प्रवेश बंदी

  बेळगाव : पावसाळ्यात खानापूर तालुक्यातील वनक्षेत्रे आणि धबधब्यांना पर्यटकांना भेट देण्यास वन विभागाने कडक बंदी घातली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव आणि वन्यजीवांना धोका असल्याने पर्यटक, विशेषतः तरुणाई सोशल मीडियावर रेलचेल करताना आढळल्यास गंभीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागातील निसर्गरम्य परिसर व धबधबे …

Read More »

मुसळधार पावसामुळे बेळगाव-चोर्ला महामार्ग बंद; खानापूर- जांबोटी मार्गाने वाहतूक वळवली

  खानापूर : खानापूर तालुक्यात पावसामुळे मलप्रभा नदीला पूर आला आहे. कणकुंबी येथे असलेल्या मलप्रभा नदीच्या उगमस्थानाजवळ, कुसमळी गावाजवळ एका नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी अचानक वाढली आणि बांधकामाधीन भागातील तात्पुरता मातीचा रस्ता पूर्णपणे खचून गेला. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. हा रस्ता जांबोटी …

Read More »