Sunday , December 14 2025
Breaking News

खानापूर

जठराच्या कॅन्सरवरील उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन

  खानापूर : खानापूर तालुक्यातील गोल्याळी पोस्ट बैलूर येथील रहिवासी 47 वर्षीय सोमनाथ वामन गोल्याळकर हे जठराच्या कॅन्सरने त्रस्त आहेत. त्यांच्यावर केएलई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने पुढील उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. तेंव्हा दानशूर व्यक्ती, सेवाभावी संघ -संस्था आणि नागरिकांनी याची नोंद घेऊन आपल्यापरिने …

Read More »

मौजे अक्राळी ता. खानापूर येथे रविवारी हळदी कुंकू कार्यक्रम

  खानापूर : मौजे अक्राळी ता. खानापूर येथे रविवार दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सकाळी ठीक दहा वाजता केसरी समर्थ युवा व महिला संघ ग्रा. पं. मोहिशेत व श्री ब्राह्मणी देवी स्पोर्ट्स क्लब अक्राळी यांच्या संयुक्त विद्यमाने हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांमध्ये सौ. …

Read More »

मणतुर्गे येथे श्री. रवळनाथ मंदिर जीर्णोद्धार कमिटीच्या वतीने हळदीकुंकू उत्साहात

  खानापूर : मणतुर्गे येथे श्री. रवळनाथ मंदिर जीर्णोद्धार कमिटीच्या वतीने मकर संक्रांतीचे औचित्य साधून मणतुर्गे येथे महिलांचा हळदीकुंकू समारंभ दि. 20 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. सुप्रिया मारुती पाटील तर स्वागताध्यक्ष सौ. आश्विनी राजाराम गुंडपिकर या होत्या. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हळदीकुंकू …

Read More »

खानापूर तालुक्याच्या लिंगनमठ गावात मृतदेह रस्त्यावर ठेवून गावकऱ्यांचे आंदोलन!

  खानापूर : स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने गावकऱ्यांनी मुख्य रस्त्याच्या मधोमध मृतदेह ठेवून निषेध केला. बेळगाव जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील लिंगनमठ गावात ही घटना घडली. खानापूर तालुक्यातील लिंगनमठात स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नाही. अनेकवेळा ग्रामस्थांनी ही बाब महसूल विभागाच्या निदर्शनास आणून दिली असली तरी अधिकाऱ्यांनी देखील याची दखल घेतली नाही. दरम्यान दि. …

Read More »

निधी अभावी नंदगड भागातील विकास कामे रखडली

  नंदगड यात्रा कमिटीने घेतली माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांची भेट खानापूर : नंदगड गावची लक्ष्मी यात्रा तोंडावर येऊन ठेपली आहे. निधी अभावी नंदगड भागातील बरीच विकास कामे रखडली आहेत. आमदर फंडातून जेमतेम पाच लाखाचा निधी नंदगड गावासाठी दिला असून हा फंड खूपच कमी असल्याची तक्रार नंदगड यात्रा कमिटीने …

Read More »

बेळगाव येथील तरूणांकडून बैलूर येथील महिलेस बेदम मारहाण!

  खानापूर : बेळगाव येथील तरूणांच्या टोळक्याने महिलेस बेदम मारहाण करून कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बैलूर (ता. खानापूर) येथे घडली आहे. या घटनेत लक्ष्मी रवळू कागणकर (४५) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बेळगाव येथील श्रीधर पाटील याच्यासह अन्य आठ जणांवर …

Read More »

खानापूर दुर्गानगर येथील श्री साईबाबा मंदिराचा कॉलम भरणी समारंभ २३ रोजी

    खानापूर : दुर्गा नगर खानापूर येथे गुरुवारी (ता. २३) सकाळी दहा वाजता श्री साईबाबा मंदिराचा कॉलम भरणी समारंभ आयोजित करण्यात आला आहे. खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते कॉलम भरणी होणार असून यावेळी मान्यवर मंडळी उपस्थित राहणार असून साईबाबा मंदिर कमिटीचे अध्यक्ष अमृत पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. …

Read More »

हलशीवाडी युवा स्पोर्ट्सच्यावतीने 25 जानेवारी रोजी भव्य हाफपीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

    खानापूर : हलशीवाडी (ता. खानापूर) येथील युवा स्पोर्ट्स यांच्यावतीने 25 जानेवारी रोजी भव्य हाफपीच सर्कल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याचा क्रिकेट संघानी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून युवा स्पोर्ट्स यांच्यावतीने क्रिकेट स्पर्धेसह विविध स्पर्धांचे आयोजन केले जात असून हाफपीच क्रिकेट स्पर्धेतील …

Read More »

ओलमणी गावातील शैक्षणिक फंडाचा स्तुत उपक्रम..

    खानापूर : शैक्षणिक फंडाच्या वतीने वार्षिक सप्ताच्या निमित्ताने सामान्य परीक्षेचे आयोजन करण्यात आले. ओलमणी गावात पारंपरिक शैक्षणिक फंडाची निर्मिती केली गेलेली आहे. आणि या फंडातून विविध असे शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. दरवर्षी प्रत्येक इयत्तेतून येणाऱ्या पहिल्या तीन क्रमांकांना तसेच विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गुणगौरव केला …

Read More »

नव्या जोमाने सीमालढ्यासाठी सिद्ध व्हा; माजी आमदार दिगंबर पाटील यांचे आवाहन

  खानापूर तालुका म. ए. समितीच्या वतीने हुतात्म्यांना अभिवादन खानापूर : मराठी अस्मितेसाठी प्राण पणाला लावलेल्या हुतात्म्यांचे स्मरण करणे मराठी भाषिकांचे नित्य कर्तव्य आहे. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी गटतट बाजूला सारुन नव्या जोमाने सीमालढ्यासाठी सिद्ध व्हा, असे आवाहन माजी आमदार दिगंबर पाटील यांनी केले. येथील स्टेशन रोडवरील हुतात्मा नागाप्पा होसुरकर …

Read More »