खानापूर : हलगा ग्रामपंचायत अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्या विरोधात बंगळुर येथील लोकायुक्त कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली असून मेरडा येथे नव्याने गटार बांधतेवेळी जुन्या गटारीसाठी वापरण्यात आलेले दगड आणि इतर साहित्य कोठे गेले याची सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. मेरडा गावामध्ये काही गटारी चांगल्या स्थितीत असताना …
Read More »भुरूणकी सरकारी शाळेचा दरवाजा तोडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोची मोडतोड!
पोलिसात तक्रार दाखल! खानापूर : खानापूर तालुक्यातील भुरूणकी येथे अज्ञात व्यक्तींनी सरकारी शाळेचा दरवाजा तोडून शाळेत प्रवेश केला व शाळेत लावलेला श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोची मोडतोड करण्यात आली असून सदर घटना काल रविवारी 27 ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री घडली असून आज 28 ऑक्टोंबर रोजी, सकाळी शाळा उघडण्याच्या वेळेला ही …
Read More »1 नोव्हेंबर काळा दिन गांभीर्याने पाळा : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्धार
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक रविवारी दि. 27 ऑक्टोबर रोजी शिवस्मारक येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई हे होते. सुरवातीला सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी प्रास्ताविक केले आणि बैठकीचा उद्देश सांगितला. त्यानंतर तालुक्यातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. 1 …
Read More »खानापूर शिवाजीनगर दुचाकी अपघातातील मृताची संख्या दोन
खानापूर : काल सायंकाळी खानापूर जांबोटी मार्गावरील शिवाजी नगर रेल्वे पुलावर काल शुक्रवारी दोन दुचाकींचा अपघात होऊन, यामध्ये रामगुरवाडी गावचा शंकर धाकलु गुरव जागीच ठार झाला होता. तर त्याचा काका रवळू गुरव व नागुर्डा येथील दुचाकीस्वार अमोल खोबान्ना पाखरे, हे दोघे जखमी गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना बेळगाव …
Read More »खानापूर – जांबोटी मार्गावर दोन दुचाकींचा अपघात; एक जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी
खानापूर : खानापूर-जांबोटी मार्गावर खानापूर शहराला लागून असलेल्या शिवाजीनगर रेल्वे पुलावर दोन दुचाकींचा अपघात होऊन यामध्ये एक जागीच ठार झाला आहे तर दोघेजण गंभीर जखमी झाले असल्याची घटना आज शुक्रवार दिनांक 25 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी घडली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, नागुर्डा येथील अमोल खोबान्ना पाखरे (वय …
Read More »खानापूर येथे २२ डिसेंबर रोजी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन
बेळगाव : गुंफण साहित्य परिषद आणि शिवस्वराज्य संघटना खानापूर यांच्या संयुक्त विद्यमाने २२ डिसेंबर रोजी खानापूर येथे मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या संमेलनाला अनेक ज्येष्ठ साहित्यिक मंडळी उपस्थित राहणार आहे. गेल्या काही वर्षांपासून गुंफण साहित्य परिषद महाराष्ट्रासह सीमा भागातील विविध गावांमध्ये मराठी साहित्य संमेलन घेत …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी महत्वपूर्ण बैठक
खानापूर : १ नोव्हेंबर काळ्या दिनासंदर्भात चर्चा करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक रविवार दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक ११ वाजता शिवस्मारक येथे बोलाविण्यात आली आहे. १ नोव्हेंबर १९५६ रोजी मुंबई प्रांतातील मराठी बहुल भाग अन्यायाने तत्कालीन म्हैसूर प्रांतात डांबण्यात आला. तेंव्हापासून १ नोव्हेंबर हा संपूर्ण …
Read More »मेरडा गावामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी
तालुका पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली हलगा पंचायत ग्राम विकास अधिकाऱ्याला सूचना खानापूर : मेरडा येथे नव्याने गटार बांधतेवेळी जुन्या गटारीसाठी वापरण्यात आलेले दगड कोठे गेले याची सखोल चौकशी करावी तसेच 2014 ते 2024 पर्यंतच्या लेखा परीक्षणाचा अहवाल देण्यात यावा अशी स्पष्ट सूचना तालुका पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी …
Read More »होनम्मा देवी तलावात 14 वर्षीय शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू
खानापूर : खानापूर-यल्लापूर राज्य महामार्गावरील कसबा नंदगड येथील होनम्मा देवी तलावात काल एका 14 वर्षीय शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची नोंद नंदगड पोलीस ठाण्यात झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, खानापूर तालुक्यातील गरबेनहट्टी येथील गिरीश बसवराज तलवार (वय 14) असे बुडालेल्या मुलाचे नाव आहे. सोमवारी दुपारी दीडच्या …
Read More »उद्या आमदारांच्या हस्ते होणार खानापूर तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमीपूजन..
खानापूर : खानापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये, महात्मा गांधी ग्रे वॉटर मॅनेजमेंट योजनेतून मंजूर झालेल्या, 3,45,78,000. (3 कोटी 45 लाख 78 हजार) रुपयांच्या योजनांचे भूमिपूजन खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते उद्या मंगळवार दिनांक 22 ऑक्टोबर 2024 रोजी होणार आहे. पारीश्वाड या ठिकाणी 99 लाख 49 हजार रुपयाच्या योजनेचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta