Sunday , December 14 2025
Breaking News

खानापूर

युवतींची बदनामी करणाऱ्या तरुणास अखेर अटक

  खानापूर : मुलींच्या व महिलांच्या फोटोंशी छेडछाड करून इंस्टाग्रामवर अपलोड करून अश्लील कृत्य व बदनामी करणारा लोकोळी गावातील आरोपी मंथन दशरथ पाटील याला ताबडतोब अटक करून त्याला कारागृहात पाठविण्यात यावेत व त्याला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी लोकोळी गावातील 150 पेक्षा जास्त युवती, …

Read More »

नियती को- ॲापरेटिव्ह सोसायटीच्या नवीन शाखेची खानापूर येथे सुरुवात

  खानापूर : डॉ. सोनाली सरनोबत यांनी बेळगाव येथे रेल्वे ओव्हरब्रिजजवळ अधिशक्ती आर्केडमध्ये नियती सहकारी संस्था सुरू केली होती, या दोन वर्षांत फुलबाग गल्ली आणि खानापूर येथेही त्या आणखी दोन शाखा सुरू करू शकल्या आहेत. खानापूरमध्ये, ते दुसऱ्या नोव्हेंबर 2023 पासून नवीन शाखा सुरू करणार आहेत. खानापूरमधून नवीन सल्लागार समितीचे …

Read More »

पतीचा गळा आवळून खून; खानापूरातील घटना

  खानापूर : खानापूर तालुक्यातील चिक्कमन्नोळी येथे पत्नीने पतीचा दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील चिक्कमन्नोळी येथील रहिवासी बाबू कलाप्पा कर्की (48) याला दारूचे व्यसन जडले होते. त्याने शेती गहाण ठेवून कर्ज काढले होते. त्यामुळे त्याची पत्नी त्याच्या त्रासाला …

Read More »

खानापूर म. ए. समितीचे काळ्या दिनी लाक्षणिक उपोषण

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आज बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर काळा दिनी शिवस्मारक येथील कै. माजी आमदार व्ही. वाय. चव्हाण सभागृहात सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत लाक्षणिक उपोषण करून त्यानंतर निषेधसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई होते. प्रास्ताविक …

Read More »

खानापूर समितीकडून जांबोटी परिसरात जनजागृती

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व युवा समितीच्या वतीने उद्याचा एक नोव्हेंबर काळा दिन तालुक्यातील संपूर्ण मराठी भाषिकांनी गांभीर्याने पाळावा व आपापले दैनंदिन व्यवहार बंद ठेवून झालेल्या अन्यायाविरोधात केंद्र शासनाचा निषेध जांबोटी गावातील व भागातील मराठी भाषिकाने गांभीर्याने करावा यासाठी जांबोटी येथे पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली. …

Read More »

काळा दिन गांभीर्याने पाळण्याचे आवाहन

  खानापूर : संपूर्ण भारत देशामध्ये 1956 मध्ये भाषावार प्रांतरचना करण्यात आली. या प्रांतरचनेमध्ये महाराष्ट्राचा एक मोठा मराठी भाषिकांचा भूभाग केंद्र सरकारने कर्नाटकाला जोडून मराठी भाषिकावर घोर अन्याय केला. या अन्यायाविरोधात केंद्र सरकारचा निषेध म्हणून एक नोव्हेंबर हा काळा दिन पाळला जातो त्या दिवसापासून आजपर्यंत सीमाभागातील मराठी भाषिक एक नोव्हेंबर …

Read More »

1 नोव्हेंबर काळ्यादिनी कडकडीत हरताळ पाळा; म. ए. समितीतर्फे खानापूरात जनजागृती

  खानापूर : 1 नोव्हेंबर काळ्यादिनी कडकडीत हरताळ पाळण्याचे आवाहन खानापूर म. ए. समिती अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी केले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावर प्रांत रचना करून 1 नोव्हेंबर 1956 रोजी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी आदी बहुसंख्य मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रापासून अलग करून अन्यायाने कर्नाटक राज्यात डांबण्यात आल्यामुळे बहुसंख्य …

Read More »

1 नोव्हेंबर काळ्यादिनी कडकडीत हरताळ पाळा; म. ए. समितीतर्फे जांबोटीत जनजागृती फेरी

  पत्रकांचेही वाटप जांबोटी : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावर प्रांत रचना करून 1 नोव्हेंबर 1956 रोजी बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकी आधी बहुसंख्य मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्र पासून अलग करून अन्यायाने कर्नाटक राज्यात डाबण्यात आल्यामुळे बहुसंख्य मराठी भाषिकावर अन्याय झाला आहे गेल्या 67 वर्षापासून सीमा भागातील मराठी भाषिक जनता महाराष्ट्रात …

Read More »

खानापूर येथील पूज्य श्री गोपाळ महाराज यांचे निधन

  खानापूर : खानापूर तालुक्यातील हलगा या ठिकाणी गेल्या 1978 पासून स्थायिक असलेले पूज्य श्री गोपाळ महाराज यांचे गुरुवारी दुपारी 12 च्या सुमारास दुःखद निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसापासून ते शारीरिक आजारामुळे त्रस्त होते. त्यांना बेळगाव केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पूज्य श्री गोपाळ महाराज हलगा हे मूळचे …

Read More »

खानापुरात पत्रकाराला मारहाण; संबंधितांवर कारवाई करावी

  दोषीवर कारवाई करा; पत्रकार संघटनेचे पोलिसात निवेदन खानापूर : खानापूर शहरात श्री दुर्गादेवीची विसर्जन मिरवणूक सुरू असताना ‘आपलं खानापूर’चे संपादक दिनकर मरगाळे यांना दोघांनी अचानकपणे मुष्टीने मारहाण केल्याने ते जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी खानापूर पोलीस स्थानकात संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची …

Read More »