Sunday , September 8 2024
Breaking News

निपाणी

गणेशोत्सव मंडळांवर सीसीटीव्हीची नजर

  व्यवस्थेबाबत मंडळांना आदेश : सामाजिक विषयावर जनजागृती निपाणी (वार्ता) : अवघ्या काही तासावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवा दरम्यान पोलिसांकडून मंडळांना सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहरात ३०० पोलिसासह होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक मंडळाची दररोज तपासणी व्यवस्थेबाबतची चौकशी होणार आहे. शहरात सुमारे १०० गणेशोत्सव मंडळाची तर ग्रामीण भागात …

Read More »

नूतन मराठी विद्यालयात विद्यार्थी बनले शिक्षक

  निपाणी (वार्ता) : येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालय प्राथमिक, माध्यमिक व श्री वेंकटेश्वरा पदवीपूर्व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानाने शिक्षक दिन कार्यक्रम झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका वठवून शिक्षकाबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. अध्यक्षस्थानी नूतन मराठी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. पचंडी तर प्रमुख पाहुणे संस्थेचे संचालक विक्रमादित्य …

Read More »

‘गुरु भवना’साठी १० लाखाचा निधी

  आमदार शशिकला जोल्ले; निपाणीत शिक्षक दिन निपाणी (वार्ता) : जीवनात आई-वडिलांसह शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. शिक्षणामुळेच माणूस उच्च पदावर पोहोचणे शक्य आहे. सीमा भागातील शाळांमध्ये ३०० वर्ग खोल्या आपल्या निधीतून बांधले आहेत. यापूर्वी गुरु भवनाला निधी उपलब्ध केला आहे. आता पुन्हा १० लाख रुपये मंजूर झाले आहेत. लवकरच गुरु …

Read More »

श्री मराठा सौहार्द सहकारी संघाचे निपाणीत उद्घाटन

  निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या हस्ते श्री. मराठा सौहार्द सहकारी संघाचे उद्घाटन झाले. काकासाहेब पाटील यांनी, मराठा समाजाने एकत्रित येऊन या संस्थेची स्थापना केली आहे. त्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांना पत मिळवून देऊन त्यांचे जीवनमान उंचवावे, असे आवाहन केले. सहकार्यारत्न उत्तम पाटील …

Read More »

श्रावण मासातील सत्संगामुळे जीवन सार्थकी

  अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज; समाधी मठात आराधना महोत्सव निपाणी (वार्ता) : श्रावण हा देव, धर्म, व्रतवैकल्य करण्याचा महिना आहे. या काळात महिनाभर प्रवचन कीर्तन असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामधून अध्यात्म शांती व मन परिवर्तन होत असते. त्यासाठी प्रत्येकाने या महिन्यात जपनाम, अन्नदान, धार्मिक सेवा केली पाहिजे. या महिन्यातील …

Read More »

गणेशमूर्तीची विटंबना थांबवा

  विविध हिंदू संघटनांची मागणी; तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात पर्यावरणाचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येत आहे. तरीदेखील अनेक विषयांमध्ये प्रशासनाकडून अपेक्षित कृती होत नाही. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘मूर्तीदान’ आणि ‘कृत्रित तलाव’ यांसारख्या मोहिमा राबवल्या जात आहेत. त्यामुळे एक प्रकारची मूर्तीची विटंबना होत आहे. …

Read More »

सलीम नदाफ यांच्या विज्ञानवारी शनिवारी नवोपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर निवड

  निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रातील स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशनतर्फे राष्ट्रीय नवोपक्रम स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये निपाणी येथील संभाजीनगर शाळेतील विज्ञान शिक्षक सलीम नदाफ यांच्या ‘विज्ञानावरी शनिवारी’ या नवोपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. पुणे येथील एस. सी.ई.आर.टीच्या सहाय्यक संचालिका शोभा खंदारे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात …

Read More »

गडहिंग्लजच्या ‘नेताजी पालकर’ने फोडली दहीहंडी

  निपाणीत गोविंदांचा थरार; रात्री उशिरापर्यंत गर्दी निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूह आणि येथील चाटे मार्केट मधील व्यापारी मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहीहंडी कार्यक्रमात ‘गो, गो गोविंदा…’ म्हणत गडहिंग्लज येथील नेताजी पालकर गोविंदा पथकाच्या गोविंदांनी थरावर थर, रचण्याची त्यांची चुरस निपाणीकरांना अनुभवता आली. ही दहीहंडी गडहिंग्लज …

Read More »

समडोळीत गुरुवारी शांतीसागर महाराज पुण्यतिथी महोत्सव

  वीर सेवा दलाचे चेअरमन बाळासाहेब पाटील; विविध कार्यक्रमांचे आयोजन निपाणी (वार्ता) : प्रथमाचार्य, चरित्र्यचक्रवर्ती, समाधी सम्राट १०८ आचार्य श्री शांतीसागर महाराज यांचा ६९ वा पुण्यतिथी महोत्सव समडोळी येथे गुरुवारी (ता.५) होणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी दिली. बोरगाव …

Read More »

शिरोळच्या गोविंदा पथकाने फोडली निपाणीची दहीहंडी; दीड लाखाचे मिळवले बक्षीस

  निपाणी (वार्ता) : ‘गोविंदा रे गोपाला’चा गजर, तरुणाईचा नृत्याचा ठेका, अधून, मधून बरसणाऱ्या पावसाच्या सरी, गगनाला भिडलेला आवाज अशा वातावरणात निपाणीत दहीहंडीचा कार्यक्रम पार पडला. येथील दिवंगत दौलतराव पाटील सोशल फाऊंडेशन, हेल्थ क्लब व पैलवान अजित नाईक युवाशक्ती संघटनेच्या संयुक्त विद्यमाने म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले …

Read More »