Sunday , December 7 2025
Breaking News

निपाणी

गरजेच्या ठिकाणी अंधार, नको तिथे पथदिपाचा उजेड

  निपाणी (वार्ता) : येथील रामनगर, अष्टविनायकनगर, वरदविनायकनगर कमलनगर येथील नागरी वस्तीमध्ये गेल्या दोन वर्षापासून पथदीप व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे या उच्चभ्रू परिसरातील नागरिकांना रात्रीच्यावेळी चाचपडत ये -जा करावी लागत आहे. तर आवश्यक नसलेल्या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून पथदीप बसविले आहेत. नगरपालिकेच्या या कारभारामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत …

Read More »

दसऱ्याच्या वाढीव सुट्टीमुळे निपाणी परिसरात गड, किल्ले तयार करण्यात बालचमू व्यस्त

  निपाणी (वार्ता) : यावर्षी शिक्षण खात्याने दसऱ्याची वाढीव सुट्टी दिल्याने निपाणी शहराच्या ग्रामीण भागातील रिकामे असलेले बालचमू चार-पाच दिवसांपासून गड-किल्ले साकारण्यात गुंतले होते. अनेक ठिकाणी किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार झाल्या असून सध्या त्यावर सैनिक ठेवण्यासह विद्युत रोषणाई केली जात आहे. शहरासह उपनगरांतील किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार झाल्या आहेत. यंदा ३४ पेक्षा …

Read More »

शेतकऱ्यांचे हित जोपासणार असाल तर प्रति टन ४ हजार रुपये दर द्या : राजू पोवार

  कर्नाटक राज्य रयत संघटनेचे बैठक निपाणी (वार्ता) : सध्या बेळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीची धामधुम सुरू आहे. त्याच्याशी संघटनेचा कोणताही संबंध नाही. निपाणी तालुक्यातील दोन उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आतापर्यंत त्यांनी कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांना सहकार्य केलेले नाही. असे असताना आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी निवडणूक लढवीत असल्याचे सांगत आहेत. हे पूर्णपणे …

Read More »

निपाणीतील जळीतग्रस्त कुटुंबीयांना अरिहंत समूहातर्फे २५ हजाराची मदत

  निपाणी (वार्ता) : येथील जुन्या पी. बी. रोडवरील नगरपालिका कार्यालयासमोर असलेल्या उत्तम मधुकर जाधव यांच्या मालकीच्या टायर विक्री व पंक्चर दुकानाला शुक्रवारी (ता.१०) रात्री भीषण आग लागून सुमारे १२ लाख रुपयांचे नुकसान झाले. या घटनेनंतर सहकाररत्न उत्तम पाटील घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी करण्यासह पीडित जाधव कुटुंबीयांशी संवाद साधला. …

Read More »

दुर्गामाता उत्सव काळात तालुक्यात जन्मल्या ४७ ‘दुर्गा’!

  कुटुंबाचा आनंद झाला द्विगुणीत : मुलींच्या जन्माचा आनंदोत्सव निपाणी (वार्ता) : ‘घरी मुलगा किंवा मुलीचा जन्म होणे’ ही सर्वांसाठीच आनंदाची बाब असते. त्यातच शक्ती आणि आदिशक्तीचा उत्सव असलेल्या नवरात्रोत्सवाच्या दिवसांतील मंगलमय वातावरणात जन्म होणे म्हणजे सुवर्ण क्षणच मानला जातो. अशाच नवरात्रीतील नऊ दिवसांच्या मंगलमय वातावरणात चिक्कोडी तालुक्यात ९६ महिलांचे …

Read More »

निपाणीतील टायर दुकानाच्या आगीत १२ लाखांचे नुकसान

  दुसऱ्या दिवशी झाली अधिकाऱ्याकडून पाहणी निपाणी (वार्ता) : येथील जुन्या पुणे बेंगलोर रोडवरील नगरपालिका समोरील टायर दुकानाला शुक्रवारी (ता.१०) आग लागली. या दुर्घटनेत उत्तम मधुकर जाधव यांच्या मालकीच्या दुकानातील सुमारे १२ लाख रुपये किमतीचे टायर व इतर मशीन जळून खाक झाले. येथे अग्निशामक दल आणि हालसिद्धनाथ साखर कारखान्याच्या बंबाने …

Read More »

जिल्हा बँकेसाठी निपाणी तालुक्यात वर्चस्वाची लढाई

  जोल्ले, पाटील यांच्यामुळे वाढली चुरस ; राजकीय गोटात चर्चेला उधाण निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यातून बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी सत्ताधारी गटाकडून माजी खासदार विद्यमान संचालक आण्णासाहेब जोल्ले आणि सहकाररत्न उत्तम पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीनंतर पुन्हा पाटील आणि जोल्ले यांनी …

Read More »

यंदा ऊसाची कमतरता असल्याने तोडणीसाठी शेतकऱ्यांनी घाई करू नये : स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी

  बोरगांव येथील सभेत शेतकऱ्यांना आवाहन निपाणी (वार्ता) : जागतिक बाजारपेठेत साखर आणि इथेनॉलला मागणी जास्त आहे. उसापासून वीज व गॅस तया होत आहे. मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला अगोदर दिला जात नाही.ऊस वाहतूक, ऊस तोडणी कामगार, कारखानदार, पतसंस्था असे सर्व घटक शेतकऱ्यांना लुटत आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी जागृती आले पाहिजे. …

Read More »

प्रति टन ४००० हजार रुपये दर घोषित केल्याशिवाय कारखाने सुरू करू नका

  रयत संघटनेचे हारूगेरी क्रॉसवर यल्गार आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : केंद्र सरकारने निश्चित केलेली यंदाच्या हंगामातील उसाची एफआरपी किंमत ही शेतकऱ्यांची पूर्णपणे फसवणूक करणारी आहे. साखर कारखाने शेतकऱ्यांना एफआरपी देण्यास सहमत नाहीत. या एफआरपीशिवाय किंमत निश्चित करून शेतकऱ्यांना पहिला हप्ता ४००० रुपये प्रति टन या दराने देण्यात यावा. …

Read More »

प्रगतीमध्ये मानवी मूल्ये, संस्कृतीची मूलभूत तत्त्वे जपावीत

  प्रा. तृप्ती करेकट्टी बागेवाडी कॉलेजमध्ये राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्र निपाणी (वार्ता) : साहित्य, संस्कृती आणि तंत्रज्ञान हे मानवी जीवनाचे तीन महत्त्वाचे पैलू आहेत. साहित्य मानवी मनाचे खरे स्वरूप प्रतिबिंबित करते. संस्कृती त्याची जीवनशैली ठरवते आणि तंत्रज्ञान त्या जीवनाला गती देते. या तीन घटकांचे संयोजन ही सध्याच्या युगातील आव्हानांना उत्तर देऊ …

Read More »