निपाणी : येथील सटवाई रोडवरील सटवाई देवीचा वार्षिकोत्सव मंगळवारी साजरा करण्यात आला. श्रीमंत दादाराजे निपाणीकर व समराजलक्ष्मीराजे निपाणीकर यांच्या हस्ते सटवाई देवीस अभिषेक घालून पूजा करेण्यात आली. यानिमित्त सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री शशिकला जोल्ले यांनी या मंदिरास भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. सटवाई देवी उत्सव कमिटीच्यावतीने …
Read More »चुरशीच्या निवडणुकीत उत्तम पाटील गटाची बाजी
अध्यक्षपदी सुरेखा सूर्यवंशी : समान मते पडल्याने चिठ्ठीद्वारे निवड निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्याचे लक्ष लागलेल्या आणि अत्यंत चुरशीने गुरुवारी (ता.२८) झालेल्या लखनापूर- पडलीहाळ ग्रामपंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सुरेखा नारायण सूर्यवंशी यांनी बाजी मारली. त्यामुळे ग्रामपंचायतीवर उत्तम पाटील गटाच्या काँग्रेसचे वर्चस्व अबाधित राहीले आहे. लखनपूर ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक अधिकारी पाटबंधारे …
Read More »निपाणी परिसरात सिद्धोजीराजेंची पुण्यतिथी विविध उपक्रमांनी
निपाणी : निपाणी नगरीचे जनक श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर सरकार यांची पुण्यतिथी शहर व परिसरात विविध उपक्रमांनी करण्यात आली. येथील नगरपालिकामध्ये श्रीमंत सिद्धोजीजीराजे निपाणकर यांची पुण्यतिथी गांभीर्याने करण्यात आली. प्रारंभी नगराध्यक्ष जयवंता भाटले व उपानगरध्यक्ष नीता बागडे यांच्या हस्ते नगरपालिकेतील सभागृहामधील प्रतिमेचे पूजन झाले. त्यानंतर निपाणकर घराण्याचे वंशज श्रीमंत दादाराजे निपाणकर …
Read More »विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न
पंकज पाटील : हायस्कूल येथे अंडी, केळी वितरण कोगनोळी : माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हायस्कूल येथील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चेअरमन प्रीतम पाटील व संचालक मंडळ यांच्यासह कर्मचारी सदैव प्रयत्नशील आहेत. शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजना विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. असे मनोगत माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील …
Read More »विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठीचा उपक्रम स्तुत्य
नगराध्यक्ष जयवंत भाटले : हरी नगर शाळेत अंडी, केळी वाटप निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्यांना बुधवारपासून शाळेतून अंडी, केळी व चिक्की देण्यात येत आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात ४५ दिवस वितरण होणार आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील कुपोषणाची समस्या दूर होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राबवलेला …
Read More »निपाणीत सटवाई मंदिराची वार्षिक यात्रा
मान्यवरांची उपस्थिती : महाप्रसादाने यात्रेची सांगता निपाणी (वार्ता) : श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर सरकार यांनी स्थापन केलेल्या श्री सटवाई मंदिरामध्ये त्रिवार्षिक यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मंत्री शशिकला जोल्ले यांच्यासह नगराध्यक्ष जयवंत भाटले व नगरसेवक उपस्थित होते. महाप्रसादाने यात्रेची सांगता करण्यात आली. निपाणी व परिसरातील बालगोपाळांचे तब्येत सुदृढ व चांगली …
Read More »ग्राहकांच्या विश्वासामुळे संस्थेची प्रगती
सुब्रमण्यम के. : ‘महात्मा बसवेश्वर’मध्ये कार्यशाळा निपाणी (वार्ता) : कोरोना महामारीच्या काळामध्ये मानव जातीचे जीवन किती क्षणभंगुर आहे, याची प्रचिती आली. पण मानवाला संसाराचा गाडा पुढे नेण्यासाठी अनेक प्रकारचे श्रम करून उपजीविकेचे साधन निर्माण करावे लागते. त्यातून राहिलेली आर्थिक पुंजी एका विश्वासार्ह सरकारी किंवा खाजगी संस्थेकडे ठेवून निर्धास्त राहण्याचा प्रयत्न …
Read More »आप्पाचीवाडी येथे हायस्कूल इमारत शुभारंभ
पालक वर्गातून समाधान : मंत्री शशिकला जोल्ले यांचे प्रयत्न कोगनोळी : आप्पाचीवाडी तालुका निपाणी येथे मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या हायस्कूल इमारतीचा शुभारंभ मंत्री शशिकला जोल्ले व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजाराम खोत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. …
Read More »उद्या खानापूर शहरातील महिलांचा रोजगारासाठी मोर्चा
बेळगाव : ग्रामीण भागातील गरीब नागरिकांना ज्या प्रकारे ग्राम पंचायतीकडून रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार देण्यात येतो. त्याप्रमाणे शहरातील गरीब महिला आणि पुरुषांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी उद्या बुधवार दिनांक 27 रोजी खानापूर शहरातील मोलमजुरी करणाऱ्या महिलांचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाची सुरुवात खानापूर शहरातील …
Read More »सदलगा इंग्लिश मिडीयम स्कूल सीबीएसईचा शंभर टक्के निकाल
सदलगा : सदलगा इंग्लिश मिडीयम स्कूल दहावीच्या सीबीएसई अभ्यासक्रमाचा दहावीचा शंभर टक्के निकाल लागला आहे. एकूण ३३ परिक्षार्थी विद्यार्थ्यांच्या पैकी १४ विद्यार्थ्यांनी डिस्टिंक्शन आणि १९ विद्यार्थ्यांनी फर्स्ट क्लास पटकावला. यांपैकी प्रथम क्रमांकावर विश्वजीत करंगळे याने ९५.८० टक्के, द्वितीय अपूर्वा कडहट्टीने ९४ टक्के, तृतीय अभिनव काडापुरे याने ९२.८० टक्के तर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta