Monday , September 21 2026
Breaking News

सदलगा इंग्लिश मिडीयम स्कूल सीबीएसईचा शंभर टक्के निकाल

Spread the love

 

सदलगा : सदलगा इंग्लिश मिडीयम स्कूल दहावीच्या सीबीएसई अभ्यासक्रमाचा दहावीचा शंभर टक्के निकाल लागला आहे. एकूण ३३ परिक्षार्थी विद्यार्थ्यांच्या पैकी १४ विद्यार्थ्यांनी डिस्टिंक्शन आणि १९ विद्यार्थ्यांनी फर्स्ट क्लास पटकावला.
यांपैकी प्रथम क्रमांकावर विश्वजीत करंगळे याने ९५.८० टक्के, द्वितीय अपूर्वा कडहट्टीने ९४ टक्के, तृतीय अभिनव काडापुरे याने ९२.८० टक्के तर चतूर्थ साक्षी वाळके हिने ९२ टक्के गुण मिळवून संस्थेचे नाव उज्ज्वल केले. ही माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रकाश जे. पाटील आणि प्राचार्य एच्. एन्. सय्यद यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *