Monday , April 20 2026
Breaking News

निपाणी येथे सटवाई देवी वार्षिकोत्सव साजरा

Spread the love

 

निपाणी : येथील सटवाई रोडवरील सटवाई देवीचा वार्षिकोत्सव मंगळवारी साजरा करण्यात आला. श्रीमंत दादाराजे निपाणीकर व समराजलक्ष्मीराजे निपाणीकर यांच्या हस्ते सटवाई देवीस अभिषेक घालून पूजा करेण्यात आली. यानिमित्त सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.

मंत्री शशिकला जोल्ले यांनी या मंदिरास भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. सटवाई देवी उत्सव कमिटीच्यावतीने मंत्री जोल्ले यांचा सत्कार करण्यात आला. महाप्रसाद वाटप मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. शहर परिसरातील सुमारे पाच हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

कार्यक्रमास नगराध्यक्ष जयवंत भाटले, सभापती राजू गुंदेशा, संतोष संगावकर, प्रणव मानवी, सद्दाम नगारजी, अमित रणदिवे, विजयराजे देसाई, अजय जाधव, सुभाष बुरुड, भालचंद्र आजरेकर, प्रशांत माने, नरेंद्र बाडकर, सुनील जाधव, दीपक बगाडे, संतोष लिगाडे, अशोक लिगाडे, प्रशांत वडके, युवराज पवार, संजय चव्हाण, संजय बुरुड, अनिकेत बुरुड, अक्षय चव्हाण, अमित चव्हाण यांच्यासह भाविक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे रविवारी (ता.१९) शिवजयंती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *