Monday , September 21 2026
Breaking News

उद्या खानापूर शहरातील महिलांचा रोजगारासाठी मोर्चा

Spread the love

 

बेळगाव : ग्रामीण भागातील गरीब नागरिकांना ज्या प्रकारे ग्राम पंचायतीकडून रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार देण्यात येतो. त्याप्रमाणे शहरातील गरीब महिला आणि पुरुषांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी उद्या बुधवार दिनांक 27 रोजी खानापूर शहरातील मोलमजुरी करणाऱ्या महिलांचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाची सुरुवात खानापूर शहरातील समादेवी गल्लीतील समादेवी मंदिरापासून होणार आहे. उद्या सकाळी ठीक साडेनऊ वाजता शहरातील महिलांनी आपली शेतीची अवजारे फावडा, बुट्ट्या, पिकास, कुदळ, खुरपी घेऊन या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन निधर्मी जनता दलचे राज्य कार्यकारिणी सदस्य रेवणसिद्धय्या हिरेमठ, रवी काडगी आणि वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *