Wednesday , December 10 2025
Breaking News

निपाणी

भगवान महावीर अध्यासन केंद्राच्या इमारतीसाठी ‘अरिहंत’तर्फे 5 लाख रुपये!

सहकाररत्न रावसाहेब पाटील : नूतन वास्तू उभारणी सभेत घोषणा निपाणी : कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासन केंद्राच्या नूतन स्ववास्तु उभारणी संदर्भात विद्यापीठात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोरगाव येथील सहकाररत्न आणि दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेबपाटील (दादा) यांनी या इमारतीसाठी पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा …

Read More »

विद्युत खांब बसवताना कंत्राटी मजुराचा मृत्यू

निपाणी : येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात नवीन विद्युत खांब व वाहिन्या बसवताना कंत्राटी मजूर खांबावरून खाली पडून वाहिन्यांमध्ये अडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता.9) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. मनोहर सदाशिव हलगेकर (वय 40 रा. धूळगोणवाडी) असे या मजुराचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, …

Read More »

पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंते सी. डी. पाटील सेवानिवृत्त

विविध ठिकाणी काम : शासनाच्या कोट्यावधी निधीची केली बचत बंगळुरू: कर्नाटक- महाराष्ट्र पूरपरिस्थिती नियंत्रणाबाबत तत्कालीन मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या सहा आंतरराज्य मंत्र्यांबरोबर चर्चा करताना सी. डी. पाटील यांच्यासह पाटबंधारे खात्याचे अधिकारी. निपाणी : हिरण्यकेशी, मार्कंडेय प्रकल्प, दूधगंगा प्रकल्प, रायबाग जी. एल. बी. सी. उपविभाग, पीडब्ल्यूडी, लघुपाटबंधारे अशा विविध विभागात सहाय्यक …

Read More »

अखेर भक्तांना देव पावला!

भाविकांसाठी पूर्ण क्षमतेने मंदिरे खुली : पर्यटनही येणार पूर्वपदावर निपाणी : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव थोपविण्यासाठी सरकारने गेल्या 17 महिन्यांपासून मंदिरांमध्ये भक्तांना प्रवेशबंदी केली होती. ही प्रवेशबंदी पूर्ण क्षमतेने उठविण्यात आल्यामुळे चिकोडी तालुक्यातील मंदिरांमधील देवाला भेटण्यासाठी आसुसलेल्या भाविकांच्या विरहाला अखेर पूर्णविराम लागला आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव थोपविण्यासाठी राज्य सरकारने …

Read More »

हक्कासाठी शेतकर्‍यांची एकजूट आवश्यक

राजू पोवार : रयत संघटनेच्या जैनवाडी शाखेचे उद्घाटन निपाणी : नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीमुळे शेतकरी वर्षानुवर्षे अडचणीत सापडला आहे. महापूर व कोरोना काळात पिकासह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. पण केवळ सर्वेच झाला असून आजतागायत शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे आपल्या न्याय हक्कासाठी रयत संघटना कार्यरत असून त्यासाठी शेतकर्‍यांची एकजूट …

Read More »

सहकार सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कार्य आदर्शवत!

रमेश कत्ती : सोसायटी बाजाराचे उद्घाटन निपाणी : सहकारी तत्त्वावर सभासदांना बरोबरच गावांचाही विकास साधत येतो. फक्त या ठिकाणी राजकारणविरहित काम केले पाहिजे. हे दाखवून दिले आहे, जत्राट गावच्या प्राथमिक कृषी सहकारी संघाचे चेअरमन रमेश भिवशे यांनी सहकारी संस्था राजकारणविरहित काम केल्यानेच आज त्यांच्या संघामार्फत जत्राट सोसायटी बाजाराचे उद्घाटन करण्यात …

Read More »

सीमाभागात रुजते गांजाशेती!

निपाणी, रायबाग तालुक्यातील शेतकरी : झटपट श्रीमंतीच्या मोहाला बळी निपाणी : श्रीमंतीच्या हव्यासापोटी शेतकरी गांजा पिकाकडे वळताना दिसत आहेत. गांजाची लागण करताना कमालीची गोपनीयता पाळली जाते. सीमाभागातील निपाणी कागल, चिक्कोडी, रायबाग तालुक्यात अनेक गावांमध्ये ऊस, सूर्यफूल आदी पिके घेतली जातात. यामध्ये गांजा लागवड केली जात आहे. वरील तालुक्यातील अनेक गावात …

Read More »

सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावा : मंडल पोलीस निरीक्षक शिवयोगी

पोलिस प्रशासनाकडून व्यापार्‍यांना सूचना निपाणी : शहर आणि उपनगरात वाढत चाललेल्या चोरीच्या व लुटमारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर निपाणी शहराकरिता आमदार फंडातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. असे असले तरी अडचणीच्या जागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी व्यापारीवर्गाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी केले. बसवेश्वर पोलिस चौक ठाण्यात आयोजित …

Read More »

शेतकर्‍यांवर अन्याय करणार्‍या मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा

राजू पोवार : रयत संघटनेच्या बैठकीत मागणी निपाणी : उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खीरीमध्ये झालेल्या हिंसाचारात चार शेतकर्‍यांचा बळी गेला आहे. सर्व शेतकरी रस्त्यावरून जात असताना मंत्री पुत्राने त्यांच्या ताफ्यावर भरधाव वाहन चालवून अमानुष कृत्य केले आहे. त्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत असून मंत्री पुत्रावर कारवाई करण्यासह अजय मिश्रा या …

Read More »

कोरोनाच्या सावटात नवरात्रोत्सवाची तयारी!

बाजारपेठेतही उत्साह कमी : मूर्तिकारही अडचणीत निपाणी : नवरात्रोत्सव अवघ्या 1 दिवसांवर आला आहे. मात्र यंदाही कोरोनाच्या सावटात नवरात्रोत्सवाची तयारी दिसत आहे. दरम्यान गुरुवारी (ता. 7) घटस्थापना होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर घरोघरी त्याची तयारी सुरू झाली आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी असला तरी खबरदारी म्हणून नवरात्रोत्सवही साधेपणानेच साजरा करावा लागणार आहे. …

Read More »