Sunday , December 7 2025
Breaking News

निपाणी

पावसाळ्यापूर्वीच मांगुर फाट्यावर पिलरची उभारणी

  युद्ध पातळीवर काम सुरू, आधुनिक मशीनद्वारे ५० फूट पायलिंग निपाणी (वार्ता) : पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम निपाणी परिसरात सुरू आहे. मांगूर फाट्यानजीक वेदगंगा नदीवरील पूल पिलरचाच व्हावा, यासाठी सीमाभागातील कर्नाटक, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह नागरिकांनी लढा दिला होता. याची दखल घेत नदीपासून उत्तरेला एक हजार फूट (३०० मीटर) …

Read More »

निपाणीत बंगला फोडून २२ तोळ्यांच्या दागिन्यांची चोरी

  बंद घराला केले लक्ष: चांदीच्या दागिन्यासह २५ हजार लंपास निपाणी (वार्ता) : शहराबाहेरील अष्टविनायक नगरातील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लूट केली. बंद घराला लक्ष करून चोरट्यांनी चांदीच्या दागिन्यासह रोख २५ हजार रुपये कंपास केले आहेत. या घटनेमुळे उपनारामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राजू …

Read More »

ग्रामीण टेनिस बॉल ‘चेअरमन चषक’ क्रिकेट स्पर्धेचे निपाणी उद्घाटन

  निपाणी (वार्ता) : येथील फ्रेंड्स ग्रुपतर्फे दिवंगत माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या प्रेरणेने हिमांशू उर्फ शशांक पाटील यांच्या स्मृतिप्रत्यर्थ आयोजित ‘चेअरमन चषक’ ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट क्रिकेट स्पर्धेचे बुधवारी (ता.२६) उद्घाटन करण्यात आले. स्वप्निल पावले यांनी स्वागत केले. येथील समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या मैदानावर आयोजित उद्घाटन प्रसंगी सहकाररत्न डॉ. …

Read More »

‘गृहलक्ष्मी’च्या लाभार्थ्यांनी बँकेत शहानिशा करावी

  रमेश जाधव यांचे आवाहन ; तालुका अनुष्ठान योजना समितीची बैठक निपाणी (वार्ता) : राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यापासून मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली अडीच वर्षापासून राज्यातील नागरिकांना पाच गॅरंटी योजनांचा लाभ मिळवुन दिला आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा …

Read More »

निपाणीत २६ नोव्हेंबरपासून फ्रेंड्स ग्रुपतर्फे ग्रामीण टेनिस बॉल ‘चेअरमन चषक’ क्रिकेट स्पर्धा

  निपाणी (वार्ता) : येथील फ्रेंड्स ग्रुपतर्फे दिवंगत माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या प्रेरणेने प्रथमच ‘चेअरमन चषक’ ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा बुधवार पासून (ता.२६) करण्यात आल्या आहेत. या स्पर्धा येथील समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या मैदानावर दिवंगत हिमांशू उर्फ शशांक संयोजित पाटील यांच्या स्मरणार्थ रविवार अखेर (ता.३०) होणार आहेत. त्याची …

Read More »

कर्नाटक राज्य ज्युनियर लंगडी संघ राष्ट्रीय लंगडी स्पर्धेमध्ये उपविजेता

  निपाणी (वार्ता) : गुजरात मधील वडोदरा येथे २१ ते २३ नोव्हेंबर अखेर १५ व्या राष्ट्रीय लंगडी स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये कर्नाटक राज्य ज्युनिअर मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात गुजरात बरोबर अटीतटीच्या खेळाचे प्रदर्शन केले. अखेर या संघाला उपविजेते पदावराच समाधान मानावे लागले. उपविजेत्या संघात भाग्यश्री मोदेनावर, संचिता जबडे, ज्योती बिल्वा, …

Read More »

निपाणीतील किल्ला स्पर्धेत साखरवाडीचा ‘राजगड’ प्रथम

  श्री मराठा बँकेतर्फे आयोजन;अमाते गल्लीतील ‘तोरणा’ द्वितीय निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकातील श्री मराठा सौहार्द संस्थेतर्फे श्री मराठा किल्ला स्पर्धा २०२५ घेण्यात आल्या. त्याला शहर आणि उपनगरातील मंडळांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.या स्पर्धेत साखरवाडी युवक मंडळाचा ‘राजगड’किल्ला अव्वल ठरला. या मंडळाला प्रथम क्रमांकाचे रोख बक्षीस आणि …

Read More »

निपाणीत फुले, शाहू, आंबेडकर विचार संमेलन यशस्वी करण्याचा कार्यकर्त्यांच्या निर्धार

  निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसराला सातत्याने २८ वर्षे विचारांची मेजवानी देणाऱ्या डॉ. डॉक्टर आंबेडकर विचार मंचने फुले, शाहू, आंबेडकर विचार संमेलन घेऊन बहुजन आणि मागास समाजाला मार्गदर्शनाचे काम करत आहे. यावर्षीही फुले शाहू आंबेडकर विचार संमेलन घेण्याचा संघटनेच्या बैठकीत निर्धार करण्यात आला. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे संमेलन दिशादर्शक ठरण्यासाठी …

Read More »

हजरत टिपू सुलतान जयंतीनिमित्त दुआ फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

  निपाणी (वार्ता) : येथील दुआ फाउंडेशन तर्फेहजरत टिपू सुलतान जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त टिपू सुलतान यांच्या प्रतिमेची पूजा करून त्यांना अभिवादन करण्यात आले. जयंतीनिमित्त येथील अंजुमन सभागृहात रक्तदान, नेत्र तपासणी शिबीर, शैक्षणिक साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्त्यांचा सत्कार, भीम मधील वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना जेवण वाटप करण्यात आले. शिबिरात …

Read More »

अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी साकारल्या मातीच्या कलाकृती

  निपाणी (वार्ता) : येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इको-करेजच्या संस्थापिका त्वचारोग तज्ञ डॉ. राजश्री चौगुले यांच्या नेतृत्वाखाली टेराकोटा कार्यशाळा पार पडली. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यशाळेसाठी शाळेच्या प्राचार्या चेतना चौगुले यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख …

Read More »