Monday , December 23 2024
Breaking News

कर्नाटक

हैदराबादहून बेळगावकडे येणारी खासगी बस उलटली; 10 प्रवासी गंभीर जखमी

  गंगावती : हैदराबादहून बेळगावला जाणारी खासगी बस गंगावती तालुक्यातील हेमगुड्डा एचआरजी नगरजवळ उलटली, यात 10 प्रवासी गंभीर जखमी झाले. समोरून येणाऱ्या बोलेरो वाहनाला चुकवण्यासाठी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली. बसमधून 50 हून अधिक प्रवाशी प्रवास करत होते. त्यापैकी 10 जण गंभीर जखमी झाले. 8 जणांवर गंगावती शासकीय रुग्णालयात …

Read More »

राज्यातील वीज दरात कपात; वीज ग्राहकांना आनंदाची बातमी

  बंगळूर : राज्यातील वीज ग्राहकांना २०० युनिटपर्यंत मोफत वीज दिलेली असतानाच, पुन्हा वीजेचे दर कमी करून वीज ग्राहकांना राज्य सरकारने खूशखबर दिली आहे. सरासरी १०० युनिटपेक्षा जास्त वीज वापरणाऱ्या ग्राहकांवर आकारण्यात येणारे विजेचे दर कमी करण्यात आले आहेत. अशा ग्राहकांनी वापरलेल्या विजेच्या प्रत्येक युनिटवर एक रुपये १० पैशांची कपात …

Read More »

मुलीनं पार पाडलं कर्तव्य; आईच्या पार्थिवाला मुलीकडून मुखाग्नी

  खानापूर : मुलगा हा वंशाचा दिवा असतो. मृत्यूनंतर मुलाने मुखाग्नी दिली तरच मोक्ष प्राप्त होतो. अश्या बुरसटलेल्या विचारांना बगल देत आपल्या मृत आईवर मुलीने अंत्यसंस्कार केल्याची घटना खानापूर तालुक्यातील करंबळ येथे नुकतीच घडली. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की मूळच्या करंबळ येथील व सध्या कारलगा येथील रहिवासी प्रभावती शंकर कवळेकर …

Read More »

करंबळ, बेकवाड गावची महालक्ष्मी जत्रा मोठ्या उत्साहात

  खानापूर : खानापूर तालुक्यातील करंबळसह होनकल, जळगे, रूमेवाडी, कौंदल महालक्ष्मी यात्रेला उत्साहात सुरुवात झाली असून आज बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 7.01 वाजता पाच गावचे ग्रामस्थ, नातेवाईक, तसेच खानापूर व तालुक्यातील भाविकांच्या उपस्थितीत अक्षतारोपणाने महालक्ष्मी यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी करंबळ, कौंदल, होनकल, जळगे, रूमेवाडी, खानापूर …

Read More »

बिदर येथे पहाटे भीषण अपघात : चौघांचा जागीच मृत्यू

  बिदर : बिदर जिल्ह्यातील भालकी तालुक्यातील सेवानगर तांडाजवळ टाटा एस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. दस्तगिर दावलसाब (३६), रशिदा सैक (४१), टाटा एस चालक वली (३१) आणि अमाम सैक (५१) अशी मृतांची नावे आहेत. उदगीरहून हैदराबादकडे …

Read More »

राज्यसभा निवडणुकीत भाजपला दोन आमदारांकडून धक्का

  भाजप नेत्यांकडून कारवाईचे संकेत; सोमशेखर यांचे क्रॉस व्होटिंग, हेब्बार मतदानास अनुपस्थित बंगळूर : भाजपपासून अंतर राखणारे आणि अनेकदा काँग्रेस नेत्यांसोबत दिसणारे यशवंतपूरचे भाजप आमदार एस. टी. सोमशेखर यांनी भाजपचा व्हीप धुडकावून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारास क्रॉस व्होटिंग केले. तर भाजपचे दुसरे आमदार शिवराम हेब्बार (यल्लापूर) यांनी मतदानच केले नाही. त्यामुळे …

Read More »

राज्यसभा निवडणूक : राज्यात कॉंग्रेसला तीन, भाजपला एक जागा

  धजद उमेदवाराचा अपेक्षित पराभव बंगळूर : राज्यसभेच्या चार जागांसाठी राज्य विधानसभेच्या निवडून आलेल्या सदस्यांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी काँग्रेसचे तीन आणि भाजपच्या एका उमेदवाराची निवड झाली असून धजद उमेदवार पराभूत झाला आहे. राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून विधानसभा सचिव एम. के. विशालाक्षी, जे राज्यसभा निवडणूक …

Read More »

बोरगाव येथील महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रम

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील माळी गल्लीतील महादेव मंदिरात शुक्रवार (ता.१) ते शनिवार (ता.९) अखेर महाशिवरात्री उत्सव सोहळा व सत्संग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. महादेव मंदिर कमिटी, बसवेश्वर क्रीडा युवक मंडळ, बसव ग्रुप, आक्कमहादेवी अक्कन बळग यांच्या संयुक्त विद्यमानाने विविध धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती संयोजन कमिटी कडून …

Read More »

निपाणी आमराईमधील रेणुका यात्रेस भाविकांची गर्दी

  निपाणी (वार्ता) : येथील श्रीमंत सिध्दोजीराजे निपाणकर-सरकार यांच्या राजवाड्यामधील जग व पालखी सौंदत्ती यल्लम्मा डोंगरास जाऊन आली. त्यानिमित्त येथील आमराई मध्ये रेणुका यात्रा भरली होती. यावेळी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. रविवारी (ता.२५) सकाळी रेणुका मंदिरामध्ये श्रीमंत दादाराजे निपाणकर व श्रीमंत सम्राज्य लक्ष्मीराजे निपाणकर यांच्या हस्ते रेणुका मातेला …

Read More »

कुंभार कुटुंब पत्रिका भरण्याचे आवाहन : शिवस्मारकात कुंभार समाजाची बैठक संपन्न

  खानापूर : दि. संत गोरा कुंभार समाज विकास मंडळ सदस्य व समन्वयकांची बैठक रविवार (दि.25) रोजी शिवस्मारक येथे दि. संत गोरा कुंभार समाज विकास मंडळाचे अध्यक्ष भैरु कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीच्या प्रारंभ दि. संत गोरा कुंभार समाज विकास मंडळाचे सचिव परशराम पालकर यांनी प्रास्ताविकेत गतबैठकीचा आढावा घेत …

Read More »