निपाणी (वार्ता) : अंमलझरी येथील रहिवासी सध्या सांगली येथे वास्तव्यास असलेले गोपाळ करंबेळकर व मंगल अरविंद करंबळेकर दाम्पत्यांनी गावातील मुलांच्या शाळेच्या जागेची अडचण पाहून अंगणवाडी शाळेसाठी स्वइच्छेने सव्वा गुंठे जागा देणगी स्वरूपात दिली. लहान मुलांच्या भविष्यासाठी दान करून याची प्रत सीडीपीओ राममूर्ती यांच्याकडेसुपूर्द केली. यावेळी राममूर्ती म्हणाले, दानत्वाची पद्धत …
Read More »मांगुर फाट्यावर भरावऐवजी पिलर होणार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; उत्तम पाटील यांनी घेतली भेट निपाणी (वार्ता) : शेतकरी कष्टकरी जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडून त्याची सोडवणूक करणारे माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या सहकार्याने केंद्रीय वाहतूक दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वेदगांगा …
Read More »ऊसतोडीसाठी शेतकऱ्यांचे कारखान्यांकडे हेलपाटे; अपुऱ्या मजुरांचा शेतकऱ्यांना फटका
कोगनोळी : ऊस उत्पादक शेतकरी ऊस तोडणीसाठी साखर कारखान्याच्या कार्यालयाकडे हेलपाटे घालून अक्षरशः मेटाकुटीला आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. साखर कारखान्याने केलेला अपुरा मजुरांचा पुरवठा यामुळे बहुतांशी शेतकरी हे ऊसतोडीच्या प्रतीक्षेत आहेत. अनेकांच्या उसांना तुरे फुटले आहेत. तर काही ठिकाणी पाण्याअभावी ऊस वाळत आहे. तरीदेखील कारखाना ऊसतोडणी देऊन शेतकऱ्यांची …
Read More »…आता आरोग्य शिबिरावरही प्रशासनाची वक्रदृष्टी!
खानापूर : शिवसेना सीमाभाग आणि लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांच्यावतीने हलशीवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला प्रशासनातर्फे आठकाठी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेचा मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने जाहीर निषेध नोंदविला आहे. तसेच कोणत्याही प्रकारची माहिती न घेता आयोजकांना त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याबाबत संताप व्यक्त …
Read More »आजी- माजी सैनिक संघटनेचे बाळूमामा नगरमध्ये उद्घाटन
निपाणी (वार्ता) : येथील बाळूमामा नगरमध्ये आजी-माजी सैनिक संघटनेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी सुभेदार रवींद्र पोवार यांनी स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. कॅप्टन प्रकाश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सुभेदार अशोक भोसले, सुभेदार जोतिबा कुंभार, नायब सुभेदार बी. आर. सांगावे, संजय साजने, झाकीर हुसेन …
Read More »पुर्वीप्रमाणे वार्षिक पाणी बील आकारून कामगाराचा थकीत पगार द्यावा
निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरातील नागरिकांना २४ तास पाणी पुरवठा आवश्यक नाही. पाणी मीटर हे हवेच्या दाबाने फिरत आहे. त्यामुळे अनेक नागरिक पाणी बील आकारणी बाबतीत तक्रार करीत आहेत. पण संबंधित त्या बाबतीत लक्ष देत नाहीत. परिणामी हजारोंच्या पटीत अनेकांना पाणी बील आल्याने नागरीक त्रस्त आहेत. याशिवाय पाणीपुरवठा …
Read More »शिक्षक दाम्पत्याकडून विद्यामंदिर शाळेला २५ बेंचची देणगी
निपाणी (वार्ता) : चौगुले दाम्पत्य शिक्षक येथील विद्यामंदिर शाळेला एक लाख रुपये किमतीचे २५ बेंच प्रदान केले. नामदेव चौगुले व अपूर्वा चौगुले यांनी प्रजासत्ताक दिनी बेंच प्रदान करून दातृत्वाचा आदर्श निर्माण केला आहे. नामदेव चौगुले हे सध्या अर्जुनी येथील शाळेमध्ये प्रभारी मुख्याध्यापक तर त्यांच्या पत्नी अपूर्वा चौगुले या २५ …
Read More »‘लक्ष्मी वेंकटेश’ क्रेडिट सौहार्दची निवडणूक बिनविरोध
निपाणी (वार्ता) : येथील दिवंगत शामराव मानवी यांनी स्थापन केलेल्या श्री लक्ष्मी वेंकटेश क्रेडिट संवर्धन संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. त्यानंतर अध्यक्षपदी धनंजय देशपांडे तर उपाध्यक्षपदी शरयू मानवी यांची निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून चिकोडी येथील लेखा परीक्षण विभागाचे उपनिर्देशक सतीश आप्पाजीगोळ होते. यावेळी संचालकपदी अभय देशपांडे, शंतनू मानवी, …
Read More »नामफलकामध्ये 60% कन्नड भाषेचा वापर करण्यासंदर्भातील अध्यादेश राज्यपालांनी नाकारला
बेळगाव : व्यावसायिक नामफलकामध्ये 60% कन्नड भाषेचा वापर करण्यासंदर्भातील अध्यादेश कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी नाकारला आहे. काँग्रेस सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत कायदा संमत करून अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र सदर अध्यादेशाला विधानसभेत मंजुरी मिळायला हवी असे कारण देत राज्यपालांनी परवानगी नाकारली असल्यामुळे सिद्धरामय्या सरकार आणि राजभवनातील मतभेद चव्हाट्यावर …
Read More »विद्यार्थ्याकडून वैश्विक तत्त्वे जोपासने गरजेचे
अन्नपूर्णा कुरबेट्टी; रोव्हर्स, रेंजर्स विभागाचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्याकडून वैश्विक तत्त्वे जोपासून या जगाचे आध्यात्मिक सौंदर्य वाढवणे शक्य आहे. जीवनात मानवी मूल्ये अंगीकारल्यानेच मानव इतर प्राण्यांपेक्षा वेगळा दिसतो. दैनंदिन जीवनात आपण याचे प्रत्यक्ष पालन कसे केले पाहिजे, याचा धडा ‘स्काऊट आणि मार्गदर्शक’ शिकवतात असे मत बेळगाव जिल्हा भारत …
Read More »