Saturday , December 13 2025
Breaking News

कर्नाटक

मांगुर ग्रामपंचायत बोगस, चुकीच्या कारभारामुळे ३८ लाखांची कामे रद्द

  निपाणी तालुका पंचायत अधिकाऱ्याचा आदेश : तालुक्यात खळबळ निपाणी (वार्ता) : ग्रामपंचायतीती सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन राजकारण विरहित कार्य केले तर गावाचा सर्वांगीण विकास होतो. मात्र मांगुर ग्रामपंचायत अध्यक्ष प्रदीप बिळगे यांनी मनमानी कारभार करत शासनाकडून मंजूर झालेल्या ३८ लाखांच्या कामांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून रद्दचे आदेश देण्यात आले. ऐन अधिवेशन …

Read More »

रयत संघटनेच्या हंचिनाळ शाखेतर्फे सैन्य दलात भरती झालेल्या जवानांचा सत्कार

  निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या हंचिनाळ शाखेतर्फे सैन्य दलात भरती झालेल्या जवानासह यंदाच्या हंगामात ऊसाला योग्य दर देण्यासाठी लढा देऊन प्रति टन ३४०० रुपये दर मिळवल्याबद्दलसं घटनेचे राज्यकार्याध्यक्ष राजू पोवार यांचा सत्कार करण्यात आला. सिद्धगोंडा पाटील यांनी स्वागत केले. त्यानंतर सैन्य दलात भरती झाल्याबद्दल अनिकेत पाटील, अभिषेक …

Read More »

महामेळावा : खानापूर समितीच्या पदाधिकाऱ्यांना घेतले पोलिसांनी ताब्यात!

  बेळगाव : आज रोजी बेळगाव सुवर्णसौध येथे होणाऱ्या कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे समितीने त्यांनी रीतसर परवानगी मागितली होती काल रविवारी समिती पदाधिकाऱ्यांना पोलीस प्रशासनाने तोंडी परवानगी दिली होती, परंतु रात्रीपासूनच पोलिसांच्या दुटप्पीपणाला …

Read More »

शेतकऱ्यांनी न्याय, हक्कासाठी अधिवेशनातील मोर्चात सहभागी व्हावे

  राजू पोवार यांचे भावनिक आवाहन : ‘रयत’च्या पदाधिकाऱ्यांची निपाणीच बैठक निपाणी (वार्ता) : वर्षानुवर्षे शेतकरी नैसर्गिक आपत्तीचा सामना करत जीवन जगत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचे आर्थिक बजेट कोलमडत आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक रयत संघटना विविध मार्गाने लढा देत आहे. तरीही शेतकऱ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्याचा जाब …

Read More »

आमदार हलगेकर साहेबांच्या पीएची नार्को टेस्ट करा : खानापूर तालुका ब्लॉक कॉंग्रेस

  खानापूर : शिरोली ग्रा. पंचायतचे सदस्य कृष्णा गुरव व दिपक गवाळकर तसेच आमदार विठ्ठल हलगेकर यांचे पीए यांच्या संभाषणाची ऑडीओ क्लीप (फोनवरील संभाषण) काल एका पोर्टलने उघडकीस आणले असून याबाबत विठ्ठल हलगेकर यांच्या पीएची नार्को टेस्ट करा, अशी मागणी खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस करणार असून अधिवेशन काळात ब्लॉक कॉंग्रेसचे …

Read More »

गर्लगुंजी येथे पंचहमी योजनेचे शिबिर उत्साहात पार; महिलांकडून उत्कृष्ट प्रतिसाद

  खानापूर : गर्लगुंजी ग्रामपंचायत आणि खानापूर तालुका पंचहमी योजना अनुष्ठान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाटक सरकारच्या महत्वाकांक्षी पंचहमी योजनेचे शिबिर गर्लगुंजी येथे उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडले. शिबिराच्या अध्यक्षस्थानी गर्लगुंजी ग्रामपंचायत अध्यक्ष ललिता कोलकार उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाटील यांच्या स्वागत आणि प्रस्ताविकाने झाली. पंचहमी योजनेचे …

Read More »

सरकारी शाळांतील इलेक्ट्रॉनिक खरेदीत महाघोटाळा; लोकायुक्तांचे छापे, लाखोंची फसवणूक उघड

  बंगळूर : शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या विविध कार्यालयांवर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यात मोठा खरेदी घोटाळा उघडकीस आला आहे. प्राथमिक तपासात राज्यभरातील हजारो सरकारी शाळांमध्ये इलेक्ट्रॉनिक साहित्य खरेदीत कोट्यवधींची फसवणूक झाल्याचे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. बंगळुर उत्तर विभागातील जिल्हा शिक्षणाधिकारी(डीडीपीआय) यांच्या अखत्यारीत एकूण १,४८३ सरकारी शाळा असून, प्रत्येक …

Read More »

कारवार तुरुंगात गुंडांचा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला

  बंगळूर : कारवार जिल्हा कारागृहातील दोन गुंडांनी आज सकाळी तुरुंग अधीक्षकांसह चार कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. हल्ला झालेल्या तुरुंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अलिकडेच, तुरुंगात कैदी आणि अंडरट्रायल कैदी विलासी जीवन जगत असल्याचे आरोप झाले आहेत. या संदर्भात, गृहमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तुरुंगात कोणत्याही प्रतिबंधित वस्तू येऊ नयेत असे …

Read More »

निपाणीत शस्त्रधारी चोरट्यांकडून धाडसी घरफोडीचा प्रयत्न

  चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद : चोरटे धावले पोलिसांच्या अंगावर निपाणी-(वार्ता) : शहरासह उपनगरात गेल्या आठवड्यापासून शास्त्रधारी चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. त्यांचा धुमाकूळ वाढतच चालला असून कुलुप बंद असलेल्या घरांना लक्ष्य करून सोन्या-चांदीच्या दागिन्यासह लाखो रुपयावर डल्ला मारला आहे. त्यामुळे चोरट्यांना पकडण्याचे आव्हान निपाणी पोलिसासमोर असतानाच शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास …

Read More »

इचलकरंजी येथील युवकाचा निपाणी जवळ खून

  धारदार शस्त्राचा वापर ; मृतदेह टाकला ओढ्यात निपाणी (वार्ता) : इचलकरंजी येथील युवकाचा निपाणी जवळील अर्जुननगर (ता. कागल) येथील एका महाविद्यालयाच्या मागील बाजूस निर्जन्य स्थळी युवकाचा खुन करून त्याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला आहे. नंतर खुना सदरचा मृतदेह येथील निकम ओढ्यामध्ये फेकून दिल्याची घटना शनिवारी (ता.६) पहाटे उघडकीस …

Read More »