बेळगाव (वार्ता) : निपाणी पोलिसांनी एका अट्टल आंतरराज्य चोरट्याला अटक करून 10 मोटरसायकली जप्त केल्या असून गडहिंग्लज तालुक्यातील करंबळी गावातील विशाल संजय मोरे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. निपाणी हालसिद्धनाथ मंदिराजवळ निपाणी बसवेश्वर पोलीस ठाण्याचे पीएसआय रमेश पवार हे ड्युटीवर असताना हा मोटरसायकल चोर पोलिसांच्या हाती लागला. पडलीहाळ …
Read More »अभिनेता दर्शनला बेळ्ळारी कारागृहात हलवले!
बेळ्ळारी : चित्रदुर्ग येथील रेणुकास्वामी यांच्या हत्येच्या आरोपाखाली बेंगळुरूच्या परप्पन येथील अग्रहार कारागृहात कैद असलेल्या अभिनेता दर्शन आता बेळ्ळारी कारागृहात आज गुरुवारी सकाळी चोख पोलीस बंदोबस्तात हलवण्यात आले. अभिनेता दर्शनला तुमकूर येथून क्यातसांद्र टोलमार्गे बेळ्ळारी येथे नेण्यात आले. दरम्यान, आपल्या आवडत्या अभिनेत्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. अभिनेता …
Read More »अभिनेता दर्शनच्या न्यायालयीन कोठडीत १३ दिवसाची वाढ
बंगळूर : बेळ्ळारी कारागृहात हलवण्यात येणार असलेला अभिनेता दर्शन याला तुरुंगात शाही पाहूणचार मिळत असल्याने चर्चेत आला आहे. दरम्यान, त्याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत आज पुन्हा वाढवण्यात आली आहे. दर्शन हा रेणुकास्वामी हत्याकांडातील मुख्य आरोपी असून न्यायालयाने त्याच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा १३ दिवसांची वाढ केली आहे. अभिनेता दर्शनसह सर्व आरोपींना …
Read More »मुडा घोटाळा : सिद्धरामय्यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी
सुनावणीकडे सर्वांचे लक्ष्य बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) प्रकरणात राज्यपाल थावरचंद यांच्या खटल्याला दिलेल्या मंजुरीच्या कायदेशीरतेला आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या याचिकेवर उच्च न्यायालय उद्या (ता. २९) पुन्हा सुनावणी सुरू करणार आहे. राज्यपालांनी १६ ऑगस्ट रोजी प्रदीप कुमार एस. पी., टी. जे. अब्राहम आणि स्नेहम यांच्या याचिकांमध्ये …
Read More »खानापूरात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या वृद्धाला तरूणांनी वाचविले
खानापूर : जीवनाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका वृद्धाला वाचवण्यात खानापूर येथील सामाजिक कार्यकर्त्यांना यश आले. बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास खानापूर नगरपालिकेजवळील पुलावरील पायऱ्यांवरून मलप्रभा नदीत उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब लक्षात येताच शेडेगाळी गावचे सामाजिक कार्यकर्ते राजू गुरव, रुमेवाडी येथील प्रभाकर सुतार, करंबळ येथील मारुती …
Read More »नौदलाची गुप्त माहिती फोडणाऱ्या तिघांना एनआयएकडून अटक
बंगळुरू : एनआयएच्या अधिकाऱ्यांनी आज उत्तर कन्नड जिल्ह्यात छापे टाकले. कारवार तालुक्यातील मुदगा, तोडुरू, कुमठा हनेहळ्ळी या गावांमध्ये एनआयएने छापा टाकला. नौदल तळाचा फोटो असल्याची गुप्त माहिती समोर आल्यानंतर एनआयए अधिकाऱ्यांनी नौदल तळावरील तिघांची चौकशी केली. २०२३ मध्ये दीपकला एनआयएने हैदराबादमधून अटक केली होती. दीपकच्या चौकशीत स्फोटक माहिती समोर …
Read More »खानापूर तालुक्यातील मळव गावात शर्यतीच्या बैलाचा पाण्यात बुडून मृत्यू
खानापूर : खानापूर तालुक्यातील मळव या गावात शर्यतीच्या बैलाचा तलावात बुडून मृत्यू झाला. याबाबत समजलेली माहिती अशी की, मळव गावातील गणपती पारशेकर हे आपली बैले धुण्यासाठी तलावात गेले होते. रस्त्याच्या कडेला एका दगडाला बैलाला बांधून दुसऱ्या बैलाला धूत असता अचानकपणे रस्त्यावरील गाडीचा हॉर्न वाजला आणि दगडाला बांधलेला बैल उधळला …
Read More »पाठिंब्याबाबत पालकमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय; नगरसेवक विलास गाडीवड्डर यांची माहिती
निपाणी (वार्ता) : राजकीय नेत्यांनी अहंकार न बाळगता सर्वसामान्यांची कामे करावीत. आपण पालकमंत्र्यांची बेळगाव येथे भेट घेऊन काँग्रेस पक्ष वाढवणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यावेळी पालकमंत्र्यांनी कोणत्याही कामासाठी आपल्याशी थेट संपर्क ठेवण्याचे सांगितले. मात्र नगरपालिकेत काँग्रेस पुरस्कृत आघाडी करण्याच्या आपल्या मागणीसंदर्भात पालकमंत्र्यांकडून अद्याप कोणताही प्रतिसाद नाही. पुन्हा एकदा पालकमंत्र्यांशी चर्चा …
Read More »मंकीपॉक्स: विमानतळांवर आरोग्य विभागाकडून हायअलर्ट
बंगळुरू : विविध देशांमध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून, या पार्श्वभूमीवर भारतालाही सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कर्नाटकात आरोग्य विभागाने विमानतळांवर अलर्ट जाहीर केला आहे. राज्यातील सर्व विमानतळ, बंदर परिसर आणि दाट लोकवस्तीच्या भागात मंकीपॉक्सवर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने परिपत्रक जारी केले आहे. सर्व विमानतळांवर सतर्कतेच्या सूचना देण्यात …
Read More »खर्गे कुटुंबाच्या संस्थेला चुकीच्या पद्धतीने जमीन हस्तांतर केल्याचा भाजपाचा आरोप
बंगळुरू : काही दिवसांपूर्वीच कथित मुडा जमीन घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात खटला चालवण्याचे आदेश राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिले होते. त्यानंतर भाजपाकडून काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात आली होती. आता मल्लिकार्जुन खर्गे यांचे कुटुंबिय सदस्य असलेल्या संस्थेला कर्नाटक सरकारने उद्योगांसाठी राखीव असलेली जमीन दिल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला …
Read More »