Tuesday , May 26 2026
Breaking News

कर्नाटक

शेडेगाळी येथील शेतकऱ्याचा हालात्री नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

  खानापूर : तालुक्यातील शेडेगाळी गावात आज शुक्रवारी (ता. 20) सकाळी सुमारे अकराच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी घटनेत एका शेतकऱ्याचा नदीत बुडून मृत्यू झाला. देवाप्पा महादेव गुरव (वय 48) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. माहितीनुसार, देवाप्पा गुरव हे आपल्या मुलासह सकाळी शेतीला पाणी देण्यासाठी गेले होते. मुलाने पंपसेट सुरू केल्यानंतर घरात …

Read More »

खानापूर तालुका समितीची मासिक बैठक व दिवंगत दीपक दळवी यांची श्रद्धांजली सभा रविवारी

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या वतीने मासिक बैठकीचे आयोजन तसेच मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दिवंगत दीपक दळवी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचेही आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक व शोकसभा रविवार दि. 22 मार्च 2026 रोजी दुपारी 2.00 वाजता राजा शिवछत्रपती शिवस्मारक येथे होणार आहे. …

Read More »

कुटुंबाचा त्याग करून कांशीरामांनी समाजाला वेगळी दिशा दिली

  ॲड. राजेंद्र थरकार; मानकापूर येथे जयंतीनिमित्त कार्यक्रम निपाणी (वार्ता) : बहुजन समाजाचे नायक कांशीराम यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य भारतभर सायकलने प्रवास करून बहुजन समाजापर्यंत तळमळीने पोहोचविले आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांची ध्येयधोरणे युवकांना पटवून दिली. कांशीराम यांनी आपल्या कुटुंबाचा त्याग करून ‘बँक बॅलन्स झिरो’सारखे अनेक उपक्रम राबविल्याचे जस्टीस …

Read More »

मंत्री संतोष लाड यांची भेट घेऊन सुप्रिया पाटील यांची विविध विषयावर चर्चा

  निपाणी (वार्ता) : कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्या आणि कर्नाटक राज्य महिला जनरल सेक्रेटरी सुप्रिया दत्ताकुमार पाटील यांनी राज्याचे कामगार मंत्री संतोष लाड यांची बेंगलोर येथे भेट घेऊन निपाणी मतदारसंघातील विविध समस्यावर चर्चा केली. विशेष म्हणजे उन्हाळ्यातील पाणीटंचाई व इतर महत्त्वाच्या बाबीवर त्यांनी प्रकाश झोत टाकला. यावेळी मंत्री लाड …

Read More »

नूतन मराठी विद्यालयात सातवीमधील विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ

  निपाणी (वार्ता) : येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित नूतन मराठी विद्यालयात विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक व्ही. एम. बाचणे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव विक्रमादित्य धुमाळ, मुख्याध्यापक एस. एस. पचंडी, एम. डी. खोत उपस्थित होते व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन …

Read More »

बसस्थानकाला वडाप वाहनासह अतिक्रमणाचा विळखा

  व्यवसायिकांचेही दुतर्फा अतिक्रमणे; प्रवाशांसह दुचाकी वाहनधारकांची कसरत निपाणी (वार्ता) : दररोज हजारो नागरिकांसह वाहनांची वर्दळ येथील बसस्थानक परिसरात असते. ग्रामीण आणि शहरातील नागरिकांसाठी बसस्थानक जोडणारे रस्ते सातत्याने गर्दीने फुलून जात आहेत. तरीही रस्त्याच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमणांमुळे नागरिक आणि वाहनधारक हैराण झाले आहेत. त्यामुळे बसस्थानकाला अतिक्रमणांचा वेढा पडल्याची स्थिती आहे. …

Read More »

विद्युत भारीत वाहिनीच्या स्पर्शाने मृत्यू झालेल्या ढोणेवाडीतील विद्यार्थ्याच्या वारसाला पाच लाखाची मदत

  निपाणी (वार्ता) : शाळेच्या खेळत असताना झाडातून गेलेल्या विद्युत प्रवाहित वाहिनीच्या स्पर्श झाल्याने ढोणेवाडी येथील विद्यार्थी बद्रीनाथ प्रकाश सूर्यवंशी याचा मृत्यू झाला होता. संबंधित कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी हेस्कॉमकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार सूर्यवंशी कुटुंबीयांना ५ लाख रुपयांचा मदतनिधी मंजूर करण्यात आला. या रकमेचा …

Read More »

गणेबैल टोल प्रकरणात मोठा निर्णय; टोल चालक कंपनीचा करार (टर्मिनेशन) रद्द

खानापूर : गणेबैल टोल प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी आज बेळगाव येथील एसी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस एसी श्रवण नाईक, एनएचएआयचे प्रोजेक्ट डायरेक्टर भुवनेश कुमार शुक्ला, काँग्रेस नेते प्रसाद पाटील, टोल कर्मचाऱ्यांचे वकील आदी उपस्थित होते. यापूर्वीच डीसी व एसपी यांची भेट घेऊन टोल कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाची माहिती …

Read More »

लग्न करण्यास नकार दिल्याने तरुणीसह तिच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला

  चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील केरूर गावामध्ये लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून एका तरुणाने आपल्या साथीदारांसह एका तरुणीवर आणि तिच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुणीच्या आई-वडिलांसह कुटुंबातील पाच सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. विद्याश्री किल्लारी असे पीडित तरुणीचे नाव असून बीरप्पा रामप्पा कज्जन्नवर या तरुणाने …

Read More »

घरे, वाहने, दागिन्यांचे बुकिंग; गुढीपाडव्यामुळे निपाणीत चैतन्य

  मराठी नववर्षाच्या स्वागताची तयारी निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील बाजारपेठेत गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र चैतन्य निर्माण झाले आहे. मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांसह व्यापाऱ्यांनी जोरदार तयारी केली आहे. विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची लगबग दिसून येत आहे. वाहने, नवीन घरे तसेच सोने दागिन्यांच्या बुकिंगला प्रतिसाद मिळत आहे. …

Read More »