
खानापूर : नुकताच खानापूर येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय बुद्धीबळ व बॅडमिंटन स्पर्धेत शासकीय माध्यमिक विद्यालय, शिरोली, ता. खानापूर येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर शाळेच्या सहा विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
बुद्धीबळ स्पर्धेत सानिका कोवाडकर, सानिका गावकर, परशराम गावकर आणि महादेव दळवी यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. तर बॅडमिंटन स्पर्धेत नागराज गावडा आणि प्रभाकर सुतार यांनी दमदार खेळ करत जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश निश्चित केला.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळा सुधारणा समिती, मुख्याध्यापिका श्रीमती अनिता चिगारे, शारीरिक शिक्षक श्री. पी. एस. पाटील तसेच सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Belgaum Varta Belgaum Varta