Saturday , December 21 2024
Breaking News

कर्नाटक

बसचा पत्रा तुटून पडल्याने महिला प्रवासी जखमी

  खानापूर : खानापूर येथे झालेल्या धक्कादायक अपघाताने केएसआरटीसी बस देखभाल आणि व्यवस्थापनातील गंभीर निष्काळजीपणा समोर आला आहे. बसचा पत्रा तुटून पडल्याने दोन महिला सुदैवाने बचावल्या. निडगल येथील पद्मिनी भुजंग कदम (६५) या गोदगेरीकडे जाणाऱ्या बसमधून प्रवास करत असताना ही घटना घडली. रुमेवाडीजवळ गाडीने भरधाव वेग घेतल्याने महिलेच्या पायाखालचे प्लायवूड निखलेले …

Read More »

खानापूर तालुका समितीच्या वतीने शहरात जनजागृती!

  खानापूर : बेळगाव येथे कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध म्हणून दरवर्षी मराठी भाषिकांच्या वतीने समितीच्या नेतृत्वाखाली महामेळाव्याचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे यावर्षीही उद्या सोमवार दि. 9 रोजी सकाळी 11 वाजता धर्मवीर संभाजी चौक बेळगाव येथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सीमाभागातील लोकांनी मोठ्या प्रमाणात बेळगाव येथील महामेळाव्याला उपस्थित राहावे …

Read More »

माजी आम. डॉ. अंजली निंबाळकर यांची उपस्थितीत हायटेक बस स्थानकातील नूतन “श्री गणेश हॉटेल(कॅन्टीन)चा उद्या शुभारंभ!

  खानापूर : खानापूर शहरातील नूतन हायटेक बस स्थानकातील इमारतीत उभारण्यात आलेल्या श्री गणेश हॉटेल कॅन्टींगचा शुभारंभ उद्या सोमवार दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. सदर कॅन्टींगचे उद्घाटन ऑल इंडिया काँग्रेस पार्टीच्या सचिव तसेच खानापूरच्या माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे. सदर श्री …

Read More »

कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर पोलिसांकडून नाकाबंदी

  राष्ट्रीय महामार्गावर बंदोबस्त; अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी कोगनोळी : बेळगाव येथे सोमवार (ता. ९) पासून (ता. १९) पर्यंत राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन चालणार आहे. या पार्श्वभूमीवर निपाणी पोलिसांच्यावतीने कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर असणाऱ्या कोगनोळी दूधगंगा नदीवर नाकाबंदी केली आहे. रविवारपासून सीमेवर जादा पोलिस मागवून नाकाबंदीची कार्यवाही सुरू केली असून महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या …

Read More »

कोविड घोटाळ्यात पैसे खाणाऱ्यांना सोडणार नाही : डी. के. शिवकुमार

  कुन्हा आयोगाच्या शिफारशींबाबत बैठकीत चर्चा बंगळूर : कुन्हा यांच्या समितीच्या शिफारशीनुसार अधिकारी कोविड बेकायदेशीरतेची चौकशी करत आहेत. कोविड प्रकरणात पैसे खाणाऱ्यांना सोडणार नाही, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले. न्यायमूर्ती मायकल कुन्हा चौकशी आयोगाच्या शिफारशींबाबत प्रभारी आणि अधिकाऱ्यांच्या समितीच्या अहवालाचा आढावा आणि शिफारशींबाबत उपसमितीची शनिवारी विधानसौध येथे बैठक झाली. …

Read More »

स्वच्छतागृहातील पैशांची लूट थांबविण्यासाठी निवेदन

  निपाणी : निपाणी येथील बसस्थानकावर कर्नाटक, महाराष्ट्रसह कोकण भागातील प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे प्रवासावेळी गैरसोय होऊ नये, यासाठी केएसआरटीसीतर्फे बसस्थानकावर शौचालये बांधली आहेत. पण, त्यांच्या वापरासाठी प्रवाशांकडून लूट केली जात आहे. ही लूट तत्काळ थांबवावी, या मागणीचे निवेदन फोर-जेआर मानवाधिकार संघटनेतर्फे परिवहन मंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना दिले. निवेदनातील माहिती अशी, बसस्थानकावर …

Read More »

तळेवाडी-गोल्याळी मार्गावर वाघाचे दर्शन!

  खानापूर : खानापूर तालुक्यातील तळेवाडी-गोल्याळी मार्गावर काल शुक्रवारी 6 रोजी रात्री 8.00 वाजण्याच्या सुमारास वाघ रस्त्यावरून पुढे जात असल्याचे दोघा दुचाकीस्वाराना दिसून आला. त्यामुळे त्यांनी घाबरून जागेवरच दुचाकी थांबवली व वाघ जाण्याची वाट पाहतच लागले. परंतु वाघ थोडा पुढे गेला आणि परत मागे फिरला व हल्ला करण्यासाठी दुचाकीस्वारांच्या दिशेने …

Read More »

मणतुर्गे येथील श्री रवळनाथ मंदिराचे कळस बांधकाम पूजन

  खानापूर : मणतुर्गे येथील श्री रवळनाथ मंदिराचे कळस बांधकाम पूजन गुरुवार दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी गावचे वतनदार पाटील श्री. सुभाष गणपती पाटील व मानकरी विष्णू गुरव पुजारी, जोतिबा दत्तू गुरव आणि श्री. ज्ञानेश्वर विष्णू देसाई यांच्या हस्ते पार पडले. सुरुवातीला कळस बांधकाम पूजन करण्यात आले. यावेळी जीर्णोद्धार समितीचे …

Read More »

मुडा प्रकरण : सिद्धरामय्यांच्या आव्हान याचिकेची सुनावणी २५ जानेवारीपर्यंत तहकूब

  बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एकल सदस्यीय खंडपीठाच्या आदेशाला दिलेल्या उच्च न्यायालयातील आव्हान याचिकेची सुनावणी २५ जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली. एकल सदस्यीय खंडपीठाने मुडा प्रकरणात त्यांच्याविरुद्धच्या चौकशीला मंजुरी दिली होती. कर्नाटक उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकार आणि इतर प्रतिवादींनाही या प्रकरणी नोटीस बजावली. मुडा घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात …

Read More »

देवेगौडा यांनी कोणालाच राजकारणात पुढे येऊ दिले नाही

  सिध्दरामय्या यांचा गंभीर आरोप; देवेगौडांवर जोरदार हल्ला बंगळूर : डॉ. राजकुमार, आपले चाहते हे देव आहेत, असे सांगायचे. परंतु आमचे मतदार आमच्यासाठी दैवत असल्याचं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज हसन येथे आयोजित लोककल्याण मेळाव्यात बोलताना सांगितले. माजी पंतप्रधान देवेगौडांवर हल्ला करताना, त्यांनी कोणालाच राजकारणात पुढे येऊ दिले नसल्याचा गंभीर आरोप …

Read More »